लोकसभा निवडणुकीच्या निकालाची धामधूम अजूनही सुरू आहे. लोकसभेच्या निकालामुळे सत्ताधारी महायुतीमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनाबाबत घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या २७ जून रोजी पार पडणार आहे.
राज्याचे पावसाळी अधिवेशन १० जून रोजी होणार होते, मात्र आता हे अधिवेशन २७ जूनपर्यंत पुढं ढकलण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अधिवेशन दोन आठवड्याने पुढे ढकलण्यात आले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये चारा छावणी व पाणी टंचाई यावर देखील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीबाबत माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते.
विधिमंडळाचे १० जूनपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. विधान परिषदेच्या ४ जागांची निवडणूक संपल्यानंतर म्हणजे जुलैमध्ये हे अधिवेशन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याच महिन्यात २८ तारखेला पावसाळी अधिवेशन घेण्याची घोषणा करण्यात आली.
लोकसभा निवडणूक पार पडल्याने आचारसंहिता संपली आहे. मात्र राज्यात विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरिता निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या या भागात आचारसंहिता कायम राहणार असल्याने अधिवेशन पुढे ढकलण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जोरदार कामगिरी करत ९ जागा जिंकल्या आहेत. मुंबईतही ठाकरेंच्या शिवसेनेनं तीन जागा जिंकत ताकद दाखवून दिली. चौथी जागा अवघ्या ४८ मतांनी गेली. मात्र या निकालाबाबत पक्षाबरोबच उमेदवार अमोल किर्तीकर यांनाही शंका असून त्या निकालाला ते न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.
रवींद्र वायकर यांनी किर्तीकर यांच्या विजयाला आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली. सुरुवातीला ती अधिकाऱ्यांनी फेटाळली. मात्र ते ठाम राहिल्यानं पुन्हा मतमोजणी करावी लागली. त्यात वायकर पुन्हा आघाडीवर आले. ही मतमोजणी करताना काही पोस्टल मतं बाद करण्यात आली. किर्तीकर यांनी त्यास आक्षेप घेतला. मात्र अधिकाऱ्यांनी तो आक्षेप फेटाळून लावत वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित केलं.
संबंधित बातम्या