मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच मुंबईत जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क उभारण्यास मंजुरी देण्यात आली.
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या मोकळ्या जागेचा वापर मुंबईकर रोज योगासने, धावणे, चालण्यासाठी करतात. त्यामुळे या मोक्याच्या जागी सेंट्रल पार्क उभारण्याची तयारी सरकारने केली आहे. एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ कोटी शासन हमी देण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
संबंधित बातम्या