महाराष्ट्रात कधीही विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होऊ शकते. निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आपल्या निर्णयांचा धडाका सुरूच ठेऊत आजच्या बैठकीत ३३ विषयांना मंजुरी दिली. राज्य सरकारकडून अनेक घोषणा करत महत्त्वाच्या निर्णयांना हिरवा कंदिल दाखवला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत रमाई, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्य सरकारकडून ३३ नवीन निर्णयांना मंजूरी देण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पाडली. या बैठकीत राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ, राज्यातील खेळाडुंसाठी पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कॅबिनेटने निर्णयांचा धडाका लावत तब्बल ३३ निर्णय घेतले. मागील कॅबिनेट बैठकीतही कॅबिनेटच्या बैठकीत असाच निर्णयाचा धडाका लावला होता.