Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज रविवारी १५ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात होणार आहे. संध्याकाळी ४ च्या सुमारास हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या शपथविधीची जय्यत तयारी केली आहे. राज्य विधिमंडळाचे आठवडाभराचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. ५ डिसेंबर रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काल मंत्री पदासाठी शिवसेना व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना फोन गेल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप त्यांची नावे समजू शकली नाही. यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून जुन्या चेहऱ्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एकूण ४० मंत्री मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. मंत्रिपदाची संधी कुणाला मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार या बाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे. तर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना व वाचल वीर असलेल्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार नसल्याची चर्चा आहे.
नागपुरात तब्बल ३३ वर्षांनी शपथविधी सोहळा होत आहे. या पूर्वी २१ डिसेंबर १९९१ मध्ये नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, मंत्रिमंडळ विस्तार व मंत्रिपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडला होता. शिवसेनेत पहिली फुट पडल्यावर नागपूरच्या राजभवनात शपथविधी झाला होता. यावेळी छगन भुजबळ व आणखी ७ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.
नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मंत्रीमंडळ विस्तार होणार असून नवे मंत्री शपथ घेणार आहेत. या शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. उद्या होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपचे २१, शिवसेनेचे १२ तर राष्ट्रवादीचे १० मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. हा शपथविधी सोहळा उद्या सकाळी ११ किंवा ४ वाजता होण्याची शक्यता आहे.
भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काल मंत्रीपदासाठी काही नेत्यांना फोन केल्याची माहिती आहे. त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही यादी खालील प्रमाणे आहे.
नितेश राणे, पंकज भोईर, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील , जयकुमार रावल, गिरीष महाजन, गणेश नाईक , मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ
आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्ता भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ
उदय सामंत, शंभुराजे देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश अबिटकर, योगेश कदम, आशिष जैस्वाल, प्रताप सरनाईक
संबंधित बातम्या