Maharashtra Cabinet Expansion: हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, ⁠⁠गुलाबराव पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Cabinet Expansion: हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, ⁠⁠गुलाबराव पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Expansion: हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, ⁠⁠गुलाबराव पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Dec 15, 2024 06:26 PM IST

Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लाईव्ह
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लाईव्ह (PTI)

Maharashtra Cabinet Expansion LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. नागपुरातील राजभवनावर हा शपथविधी सोहळा पार पडत आहे. येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे.

महायुती सरकारच्या मंत्रीमंंडळाचा विस्तार

 

  •  भाजप नेत्या माधुरी मिसाळ यांनी राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली.  त्या २००९ पासून सलग चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आले.

 

  • भाजप नेते आणि राधानगरी मतदारसंघातून सगल तीन वेळा विजयी ठरलेले प्रकाश आबिटकर यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.

 

  •  भाजप नेते आकाश फुंडकर मंत्री म्हणून शपथ घेतली. शांत संयमी अशी त्यांची ओळख आहे. 

 

  • भाजप नेते नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. नितेश राणे हे २०१५ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय झाले.

 

  • राष्ट्रवादी काँग्रेस नेते मकरंद पाटील यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यांनी २००२ ते २००७ पर्यंत जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून काम केले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला.

 

  • भरत गोगावले यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी दोन वेळा विजय मिळवला आहे.  त्यांनी १९९६ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेते प्रवेश केला होता. 

 

  • संजय शिरसाठ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली.  त्यांनी २००० साली पहिल्यांदा औरंगाबाद येथून नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकली होती. 

 

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरी मतदारसंघातील आमदार नरहरी झिरवळ यांनी मंत्रीमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली.  महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रीपद मिळल्यास आवडेल अशी इच्छा व्यक्त केली होती.  

 

  • भाजप नेते अतुल सावे यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. या निवडणुकीत त्यांनी संभाजीनगर मतदारसंघातून विजय मिळवला.

 

  • भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

 

  • शिंदखेडा मतदारसंघातून आमदारकी जिंकलेले भाजप नेते जयकुमार रावल यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.  ते २००४ पासून सलग पाच वेळा विजयी झाले आहेत.

 

  • शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी मंत्री म्हणून शपत घेतली. त्यांनी रत्नागिरी मतदार संघातून सलग पाच वेळ विजय मिळवला आहे. उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नेते आहे.

 

  • मंगलप्रभात लोढा यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यांनी मलबार हिल मतदार संघातून विजय मिळवला आहे. १९९५ पासून ते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

 

  • धनंजय मुंडे यांनी यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.  परळी मतदारसंघातून त्यांनी सलग दोन वेळा विजय मिळवला आहे.  महाविकास आघाडी सरकारच्या काळात धनंजय मुंडे यांनी मंत्री म्हणून  जबाबदारी पार पडली होती.

 

  • महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांना संधी देण्यात आली. 

 

  • शिंदे गटाचे विश्वासनीय नेते दादा बुसे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी मालेगाव बाह्य मतदारसंघातून विजय मिळवला आहे. याआधी त्यांनी मंत्रिमंडळातील अनेक खाते संभाळली आहेत.

 

  •  १९९५ पासून सलग सात वेळा आमदार राहिलेले भाजप नेते गणेश नाईक यांनी महायुती सरकारचे मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी ठाण्याचे पालकमंत्री म्हणून पद भूषवले आहे.

 

  • शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत त्यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळवला.  या मतदारसंघातूनत्यांनी सलग पाच वेळा  विजय मिळवला.

 

  • जामनेर मतदारसंघातून सात वेळा आमदारकी जिंकलेले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजप नेते गिरीज महाजन यांनी महाराष्ट्राचे मंत्री म्हणून शपथ घेतली.

 

  • २०१४ पासून कोथरूड मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले चंद्रकात पाटील यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून स्थान देण्यात आले.  

 

  •  अजित पवार गटाचे आमदार हसीन मुश्रीफ यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.  विधानसभेवर निवडन येण्याची ही त्यांची सहावी वेळ आहे. 

 

  • राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली.

 

  • भाजप नेते चंंद्रशेखर बावनकुळे यांची घेतली मंत्रिपदाची शपथ!

 

  • राज्यपालांचे मंचावर आगमन झाले आहे. त्यांनतर आता राष्ट्रगीत पार पडलं आहे. अवघ्या काही मिनिटांत शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. एकूण 39 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर