Maharashtra News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर आज नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण ३९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात शिंदे आणि अजित पवार गटाला किती मंत्रीपदे मिळाली? याची यादी पाहुयात.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुतकीच्या निकालानंतर ५ डिसेंबर २०२४ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपद घेतली. तर, शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आणि अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. भाजपाच्या एकूण १९ आमदारांनी, शिवसेनेच्या एकूण ११ आमदारांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस ९ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली.
१) एकनाथ शिंदे
२) गुलाबराब पाटील
३) दादा भूसे
४) संजय राठोड
५) उदय सामंत
६) शंभूराज देसाई
७) संजय शिरसाट
८) प्रताप सरनाईक
९) भरत गोगावले
१०) प्रकाश आबिटकर
११) आशिष जैस्वाल
१२) योगेश कदम
१) हसन मुश्रीफ
२) धनंजय मुंडे
३) हसन मुश्रीफ
४) दत्तात्रय भरणे
५) आदिती तटकरे
६) माणिकराव कोकाटे
७) नरहरी झिरवाळ
८) मकरंद जाधव
९) इंद्रनील नाईक
१०) माणिकराव कोकाटे
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भव्य रोड शो केला. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी माझ्या जन्मभूमीवर आणि कर्मभूमीवर आलो आहे, हा आनंदाचा क्षण आहे. नागपूर हे माझे कुटुंब आहे आणि त्याचे माझ्या कुटुंबाकडून स्वागत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. फडणवीस हे पत्नी अमृता फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूर विमानतळावर सजवलेल्या ओपन टॉप वाहनात बसले होते. रॅलीच्या मार्गावर भूमिपुत्राचे स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने २८८ पैकी २३० जागांवर विजय मिळवला आहे. १३२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपसाठी हा निकाल महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला. शिवसेना आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे ५७ आणि राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या.
संबंधित बातम्या