Devendra Fadnavis: नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारचा शपथ विधी सोहळा झाला. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच येत्या दोन दिवसांत मंत्र्यांचे खातेवाटप करून त्याच्या कारभाराला गती देऊ अशी ग्वाही दिली.
नुकताच महायुतीच्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा नागपुरातील राजभवनात पार पडला. आता मंत्र्यांच्या खातेवाटपाची प्रतीक्षा आहे. ते रात्री उशिरापर्यंत होण्याची शक्यता होती, पण ते येत्या दोन- तीन दिवसांत करून गतिमान कारभार सुरु करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. खातेवाटपाबाबत महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा झाली असून तिघांचेही त्यावर एकमत झाले आहे, असेही फडणवीस म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, अलीकडे पायंडा पडला आहे की, विरोधक चहापानावर बहिष्कार टाकतात. त्यामुळे चहापान करावे की नाही? हा एक प्रश्न आहे. विरोधक संख्येने कमी असले तरी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातील. येत्या दोन- तीन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खातेवाटप जाहीर करतील. आम्हाला प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे रेटून काम नेणार नाही. आम्ही विरोधकांकडे दुर्लक्ष करणार नाही, अशी ग्वाही देतो, असे अजित पवार म्हणाले.
‘आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खातेवाटप होईल. नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देतो. आम्ही टीम म्हणून काम केले. आम्ही दोघे मिळून दोनशे आमदार निवडून आणू, असे मी सभागृहात म्हणालो होतो. अजितदादा सोबत असल्याने अधिक जागा जिंकल्या’, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. भाजपाच्या एकूण १९ आमदारांनी, शिवसेनेच्या एकूण ११ आमदारांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस ९ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली.
१) चंद्रशेखर बावनकुळे
२) राधाकृष्ण विखे पाटील
३) चंद्रकांत पाटील
४) गिरीश महाजन
५) अतुल सावे
६) गणेश नाईक
७) मंगलप्रभात लोढा
८) शिवेंद्रराजे भोसले
९) जयकुमार रावल
१०) पंकजा मुंडे
११) आशिष शेलार
१२) अशोक उईके
१३) जयकुमार गोरे
१४) संजय सावकारे
१५) नितेश राणे
१६) आकाश फुंडकर
१७) माधुरी मिसाळ
१८) मेघना बोर्डीकर
१९) पंकज भोईर
२०) शंभुराज देसाई
२१) उदय सामंत
२२) दादा भुसे
२३) गुलाबराव पाटील
२४) संजय राठोड
२५) संजय शिरसाट
२६) प्रताप सरनाईक
२७) भरत गोगावले
२८) प्रकाश आबिटकर
२९) आशिष जयस्वाल
३०) योगेश कदम
३१) हसन मुश्रीफ
३२) आदिती तटकरे
३३) बाबासाहेब पाटील
३४) दत्तात्रय भरणे
३५) नरहरी झिरवळ
३६) माणिकराव कोकाटे
३७) मकरंद जाधव-पाटील
३८) धनंजय मुंडे
३९) इंद्रनील नाईक
संबंधित बातम्या