Maharashtra Cabinet Decisions : राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये बदल करून केंद्रातील एनडीए सरकारनं आणलेली एकात्मिक पेन्शन योजना (Unified Pension Scheme) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे. लाखो कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मार्च २०२४ पासूनच या निर्णयाची अंमलबावणी करण्यात येणार आहे.
या योजनेतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदानं प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी (वर्गणीशी) निगडीत असेल. ज्या कालावधीसाठी सभासदानं अंशदान भरलेलं नसेल तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही. कर्मचाऱ्याचं ज्या कालावधीचं अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेलं नाही असं अंशदान भविष्यात कर्मचाऱ्यानं व्याजासह भरल्यास तो कालावधी वरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य सरकारनं स्वीकारली आहे.
राज्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय.
गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ
ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार
थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी
पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार
नार - पार - गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी ७ हजार १५ कोटीस मान्यता. नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा
सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत
ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करणार. सव्वा कोटी ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार
ठाणे येथील महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रित ५ हजार कोटी निधी उभारणार
बार्टीच्या त्या ७६३ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ
मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार
विविध महामंडळे प्रकल्प राबविणार
कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ
कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ
चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल
श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना मिळणार
पाचोर्यातील सहकारी सूत गिरणीस सरकारी अर्थसहाय्य देणार
सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन देण्याचा निर्णय