मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Budget 2024 : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून; ‘या’ दिवशी अर्थसंकल्प होणार सादर

Maharashtra Budget 2024 : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून; ‘या’ दिवशी अर्थसंकल्प होणार सादर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 20, 2024 10:54 PM IST

Maharashtra Budget Session 2024 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला२६फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प दोन्ही सभागृहात सादर केला जाणार आहे.

Maharashtra Budget Session 2024
Maharashtra Budget Session 2024

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला२६फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशन एक मार्चपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करेल. अर्थमंत्री अजित पवार यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे निवडणुकीचे वर्ष असल्याने राज्य सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदा निवडणुका असल्यानेराज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला दोन्ही सभागृहात दुपारी दोन वाजता मांडण्यात येणार आहे.मंगळवारी विधानभवनात विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील,विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे हे उपस्थित होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात २०२३-२४ च्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. २८ फेब्रुवारीला शासकीय कामकाजाला सुरुवात होईल. त्यानंतर अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी या अंतरिम अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशना पहिल्या दिवशी विधानसभेत राज्यपालांचं अभिभाषण होईल. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव सादर केला जाईल.

IPL_Entry_Point