मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra SSC Result Live: यशस्वी विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Maharashtra Board SSC Result 2022

Maharashtra SSC Result Live: यशस्वी विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

  • Maharashtra Board SSC Result 2022 Live Updates: शैक्षणिक जीवनाचा पहिला व महत्त्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या इयत्ता दहावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

Fri, 17 Jun 20227:55 IST

Maharashtra Board SSC Result: दहावीचा निकाल ऑनलाइन दिसू लागला, गुणपत्रिका पाहण्यासाठी धावपळ

दहावीच्या परीक्षेचा निकाला शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर दिसू लागला असून गुणपत्रिका पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. आनंदाची बातमी नातेवाईकांना दिली जात आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे स्क्रीन शॉट व्हॉट्सअॅपवरून जवळच्या व्यक्तींना शेअर केले जात आहेत.

Fri, 17 Jun 20226:13 IST

Maharashtra Board SSC Result: गुणपडताळणीसाठी २९ जून पर्यंत अर्ज करता येणार

परीक्षेत मिळालेल्या गुणांबद्दल शंका असल्यास विद्यार्थ्यांना २० जून ते २९ जून या कालावधीत गुणपडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी प्रति विषय ५० रुपये शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. याबाबतची सर्व माहिती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Fri, 17 Jun 20226:11 IST

Maharashtra Board SSC Result: मार्च २०२० च्या तुलनेत निकालाचा टक्का वाढला

मार्च २०२० च्या तुलनेत दहावीच्या निकालातील यशाचा टक्का वाढला आहे. २०२० च्या तुलनेत १.६४ टक्के जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या म्हणजेच, २०२१ च्या तुलनेत मात्र ही टक्केवारी बरीच कमी आहे. कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी ऑनलाइन परीक्षा झाल्या होत्या. त्यावेळी दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागला होता.

Fri, 17 Jun 20226:11 IST

Maharashtra Board SSC Result: राज्यातील १२,२१० शाळांचा निकाल शंभर टक्के

दहावीच्या परीक्षेसाठी २२,९२१ शाळांच्या माध्यमातून १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२,२१० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

Fri, 17 Jun 20225:51 IST

Maharashtra Board SSC Result: निकालात कोकण विभाग सगळ्यात पुढे

दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला आहे. या विभागातून ९९.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी (९५.९०%) लागला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या यशाची टक्केवारी ९४.४० इतकी आहे.

Fri, 17 Jun 20225:51 IST

Maharashtra Board SSC Result: बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही मुलींची बाजी

दहावीचा निकाल जाहीर झाला असून बारावीप्रमाणे दहावीतही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९७.९६ टक्के लागला असून मुलांच्या यशाची टक्केवारी ९६.०६ टक्के इतकी आहे.

Fri, 17 Jun 20225:41 IST

Maharashtra Board SSC Result: दहावीचा निकाल जाहीर. राज्याचा निकाल ९६.९४ टक्के

दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Fri, 17 Jun 20224:20 IST

Maharashtra Board SSC Result: फेरमूल्यांकन अथवा गुणपडताळणीसाठी स्वतंत्र अर्ज करता येणार

विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिकेबाबत वा मार्कांबाबत काही शंका असल्यास शाळेमार्फत वा बोर्डाच्या संकेतस्थळावरून स्वतंत्र अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी ही २० जून रोजी सुरू होणार असून छायाप्रतीसाठी २९ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी शुल्क हे आॅनलाइन पद्धतीनं भरता येणार आहे.

Fri, 17 Jun 20224:17 IST

Maharashtra Board SSC Result: या संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल

दहावी परीक्षेचा निकाल हा ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे. त्यांची छापील प्रतही काढता येणार आहे.

Fri, 17 Jun 20224:15 IST

Maharashtra Board SSC Result: धाकधूक वाढली; दहावीचा निकाल आज जाहीर होणार

करोनाचं संकट घोंगावत असताना ऑफलाइन झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांनाही प्रचंड उत्सुकता आहे.

शेअर करा

  • Share on Twitter
  • Share on FaceBook