Sanjeevraje Naik Nimbalkar News : सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं मंगळवारी छापा टाकला होता. ही कारवाई तब्बल पाच दिवस सुरू होती. या चौकशीत अधिकाऱ्यांना मोठं घाबड हाती लागलं असल्याची माहिती आहे. दरम्यान, चौकशी संपल्यावर संजीवराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार होते. मात्र, त्यापूर्वी ही कारवाई करण्यात आली.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुण्यातील व सातारा येथील घरावर मंगळवापासून आयकर विभागाने छापे टाकले होते. तब्बल पाच दिवस ही कारवाई सुरू राहिली. निंबाळकर यांच्या पुण्यातील व फलटण येथील घरावर व विविध मालमत्तेवर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. या चौकशीत गोविंद दूध डेअरी बाबत देखील अनेक प्रश्न विचारण्यात आले. आयकर विभागाची कारवाई संपल्यानंतर निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. मोठ्या प्रमाणात फटाके फोडून त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली.
आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत संजीवराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आयकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यांच्या फलटण येथील घरावर छापा टाकण्यात आला होता. यावेळी संजीवराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना आयकर विभागानं अनेक प्रश्न विचारले. त्यांच्याजवळील अनेक कागदपात्रांची चौकशी करण्यात आली. मात्र, या चौकशीत काहीही सापडलं नसल्याची माहिती संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. माझ्याकडून काहीही जप्त केलं नाही. ही छापेमारी व्यक्तिगत माझ्यावर नव्हती. गोविंद मिल्क संदर्भात ही कारवाई होती असे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. गोविंदच्या संचालकांची चौकशी झाली आहे. त्यामध्ये त्यांना काहीही आढळले नाही. पहिल्या दोन दिवसात चौकशी संपली होती. ही राजकीय होती का असे विचारले असता सांगता येत नाही. आताच्या काळात काहीही होऊ शकतं. राष्ट्रवादी पक्ष प्रवेशावर चर्चा सुरू आहे, अजून निश्चित नाही. काही डाटा घेऊन गेले आहेत जेव्हा ते विचारातील तेव्हा आम्ही उत्तर देऊ, असे देखील निंबाळकर म्हणाले.
संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून त्यांच्या फलटण येथील लक्ष्मी नगर भागातील निवासस्थानी व पुण्यातील बंगल्यावर कर्मचाऱ्यांनी छापा टाकला होता. निवासस्थानामधील सर्वांचे मोबाईल देखील काढून टाकण्यात आले होते. तर घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
संबंधित बातम्या