Parbhani Band News : परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या प्रकरणी पोलिसांनी ५० जणांना अटक केली होती. यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली हे. आनंदराज आंबेडकर यांनी परभणीसह महाराष्ट्र बंदची हाक दिली असून या पार्श्वभूमीवर आज परभणीत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर राज्यभरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
परभणी रेल्वे स्थानकाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याने याचे हिंसक परिणाम परभणीत उमटले. परभणीत मोठ्या प्रमाणात तोंडफोड, जाळपोळ व दगडफेक करण्यात आली होती. पोलिसांनी काही जणांना अटक देखील केली होती. यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. सूर्यवंशी याचा मृत्यू हा संशयास्पद असल्याने या प्रकरणी चौकशीची मागणी करत आंबेडकरी संघटनांनी रविवारी रात्री बैठकीत परभणी व महाराष्ट्र बंदची हाक दिली. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील मैदानामध्ये विविध संघटनांतर्फे आंदोलंन करण्यात येत आहे.
राज्यभरात पुकारण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही ठिकाणी व्यावसाईकांनी बंदला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली होती. तर काही ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. परभणीत या बंदला प्रतिसाद मिळाला. अनेक दुकाने ही बंद ठेवण्यात आली. तर पोलिसांनी देखील गैर प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप हे स्वतः परभणीत आले असून सर्व परिस्थितीवर त्यांनी लक्ष घेवले आहे.
सोमनाथ सूर्यवंशी हा न्यायालयीन कोठडीत असतांना त्याच्या छातीत कळ येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दवाखान्यात नेल्यावर त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाचे न्यायालयीन समितीच्या देखरेखीत शवविच्छेदन करण्यात आले आहे. मात्र, अद्याप अहवाल आलेला नाही.
संबंधित बातम्या