मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत, अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार

Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत, अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार

Jun 15, 2024 12:15 AM IST

Maharashtra assembly session : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार,२७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. तसेच अर्थसंकल्प २८ जून रोजी अर्थमंत्री अजित पवार सादर करणार आहेत.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली

Maharashtra Assembly Session: १८ व्या लोकसभेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुका संपल्या असून केंद्रात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. आता येत्या काही महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. याआधी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची (rainy session)  तारीख ठरली आहे.आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या २७ जूनपासून सुरू होत असून ते १२ जुलैला संपणार आहे.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार,२७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवनात विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

पावसाळी अधिवेशन २७ जून ते शुक्रवार,१२ जुलै २०२४ या कालावधीत होणार असून,एकूण १३ दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील,असे या बैठकीत ठरविण्यात आले.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.  नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा  उपाध्यक्ष  नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनीअधिवेशनाची अधिसूचनाही जारी केली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे हे पावसाळी अधिवेशन होत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडीने भरघोस यश मिळवल्याने आता हे अधिवेशनाला महत्व आले आहे.

 

विधीमंडळाच्या पावसाळी अधिनेशनात राज्यातील दुष्काळ आणि शेती विषयांवर चर्चा होणार असल्याची चर्चा आहे, तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा विधिमंडळात गाजणार असल्याची चर्चा आहे.

WhatsApp channel