मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jayant Patil: सत्ताधाऱ्यांची बाजू घेऊन बोलू नका; जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावले

Jayant Patil: सत्ताधाऱ्यांची बाजू घेऊन बोलू नका; जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावले

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 23, 2022 04:46 PM IST

Jayant Patil Vs Rahul Narvekar: विरोधी पक्षनेते अजित पवार यांना बोलताना मध्येच थांबवल्यामुळं संतापलेल्या जयंतव पाटील यांनी आज विधानसभा अध्यक्षांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

Rahul Narvekar - Jayant Patil
Rahul Narvekar - Jayant Patil

 Jayant Patil Vs Rahul Narvekar: आपण सत्तारूढ पक्षाची बाजू घेऊन बोलत असल्याचा भास आम्हाला होत आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. 

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर बोलत असताना विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना थांबवले. यावर जयंत पाटील यांनी लगेचच हरकतीचा मुद्दा उपस्थित करत विधानसभा अध्यक्षांना जाब विचारला. सभागृहाला एखादी माहिती देण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. मात्र, विरोधी पक्षनेते बोलत असताना त्यांना थांबवणं योग्य नाही. त्यांचं भाषण झाल्यानंतर माहिती देता येऊ शकते. मात्र, विरोधी पक्षनेते बोलत असताना सत्ताधारी पक्षाची बाजू मांडल्यासारखं आपण बोलू नका, असं जयंत पाटील यांनी यावेळी सुनावलं.

मंत्री उत्तरं देत नाहीत मग खातेवाटप कशाला केले?

विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवर चर्चा होत असताना सभागृहात संबंधित विभागाचे मंत्रीच उपस्थित नव्हते. या विषयाकडं विधानसभा अध्यक्षांचं लक्ष वेधण्यात आलं. जे मंत्री उत्तर देणार आहेत, त्यांनी सदस्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं. मंत्री नसतील तर उत्तरं कोण देणार? मुख्यमंत्री महोदय सगळ्यांची उत्तर देणार असतील तर तसं त्यांनी स्पष्ट करावं. पण मंत्र्यांना उत्तर द्यायची नव्हती तर खातेवाटप कशासाठी केले? मंत्र्यांना उत्तरं द्यायचा अधिकार आहे. सगळेच अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असण्याची गरज नाही. ४० दिवस विस्तार थांबवला आता उत्तराला टाळाटाळ करत आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

IPL_Entry_Point