Maharashtra Assembly Session Live : आमदारांच्या शपथविधीनंतर विधानसभेचं कामकाज स्थगित
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Assembly Session Live : आमदारांच्या शपथविधीनंतर विधानसभेचं कामकाज स्थगित

Maharashtra Assembly Session Live : आमदारांच्या शपथविधीनंतर विधानसभेचं कामकाज स्थगित

Dec 07, 2024 02:01 PM IST

Maharashtra Assembly Session Live : महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू असून नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जात आहे.

Maharashtra Assembly Session Live : आमदार नीतेश राणे यांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ
Maharashtra Assembly Session Live : आमदार नीतेश राणे यांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ

Maharashtra Assembly Session Live : महायुती सरकारचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानात पार पडल्यानंतर आज विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं. तिथं आमदारांचा शपथविधी सोहळा सुरू आहे.

महाराष्ट्र विधानसभा विशेष अधिवेशन लाइव्ह

 

 

> विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा समारोप

नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीनंतर विधानसभेचं कामकाज आज स्थगित करण्यात आलं. उद्या, ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुन्हा सभागृहाचं कामकाज होणार आहे. या दिवशीच्या कामकाजाची माहिती विधानसभेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

> आमदार नीतेश राणे यांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ

कणकवलीचे आमदार नीतेश राणे यांनी संस्कृत भाषेत आमदारकीची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय श्रीराम अशी घोषणाही दिली.

> राज्याच्या १५ व्या विधानसभेत ७८ सदस्य नवीन

महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेत तब्बल ७८ सदस्य पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. यात भाजपचे ३३, शिंदेंच्या शिवसेनेचे १४, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ८ आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे ४ जण व इतर पक्षांतील १९ आमदार आहेत.

> ईव्हीएम सरकारचा विरोधकांकडून निषेध 

राज्यात सत्तेवर आलेलं महायुतीचं सरकार हे लोकशाही सरकार नाही. हे सरकार म्हणजे ईव्हीएमचा चमत्कार आहे. आमचा शपथविधीला विरोध नाही. सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. आम्ही आज शपथ घेतली नाही, पण घेणारच नाही असं नाही - भास्कर जाधव

> विरोधी बाकांवरील आमदारांचा आजच्या शपथविधीवर बहिष्कार

महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार घातला. अनेक आमदारांनी शपथ घेतली नाही. विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून विरोधी आमदारांची घोषणाबाजी 

> महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनला सुरुवात 

विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली असून आज विधानसभेचं विशेष अधिवेशन होत आहे. नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर