kirit somaiya : किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओतील 'ती' महिला कोण?; अनिल परबांच्या सवालावर फडणवीस म्हणाले...
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  kirit somaiya : किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओतील 'ती' महिला कोण?; अनिल परबांच्या सवालावर फडणवीस म्हणाले...

kirit somaiya : किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओतील 'ती' महिला कोण?; अनिल परबांच्या सवालावर फडणवीस म्हणाले...

Jul 18, 2023 04:12 PM IST

who is that woman in kirit somaiyas viral video : किरीट सोमय्या यांच्याबरोबर या व्हिडिओतील महिला कोण, याचा शोध घ्यावा अशी मागणी अनिल परब यांनी गृहमंत्र्यांकडे केली.

अनिल परब
अनिल परब

मुंबई –भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोमवारी एका वृत्तावाहिनीवरून प्रसारित झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या व्हिडिओ क्लिप प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी याप्रकरणी राज्य सरकारने कुठलीही तपास यंत्रणा लावून सत्यता पडताळून पहावी तसेच या किरीट सोमय्या यांच्याबरोबर या व्हिडिओतील महिला कोण, याचा शोध घ्यावा अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली.

विधान परिषदेत अनिल परब म्हणाले की, मागील सरकारच्या काळात अनेक पेनड्राईव्ह बॉम्ब सभागृहात फुटले. काल एका चॅनेलवर भाजपाच्या माजी खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कुणाचीही बदनामी होऊ नये. कुणाच्या राजकीय आयुष्यात बदनामी काय असते? उद्ध्वस्त झाले तर तो राजकारणाचा भाग असतो. परंतु एखाद्याचे खासगी कुटुंब उद्ध्वस्त होतंयाचा अनुभव आम्ही घेतला आहे.जेव्हा आमच्या मुलाबाळांवर आरोप केले जातात. यंत्रणेसमोर उभे केले जाते. काल ज्या माजी खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याने अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे या व्हिडिओची सत्यता बाहेर आली पाहिजे. व्हिडिओतील महिला कोण हे समोर आले पाहिजे अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

परब म्हणाले की, सोमय्यांच्या पत्रात हा व्हिडिओ खोटा आहे असं कुठेही म्हटलं नाही. हा व्हिडिओ कुणी घेतला, का घेतला, खंडणीसाठी धमकी आहे का हे बाहेर आले पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. अनेक महिलांच्या तक्रारी समोर आल्यात. हे खरे खोटे माहिती नाही. हे शोधण्याचे काम तपास यंत्रणेने केले पाहिजे. ज्या पद्धतीची ही विकृती आहे. सेक्स खंडणी मागितली जात असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. ८ तासांचे व्हिडिओ आहेत. केंद्रीय यंत्रणेचा वापर करून गैरप्रकार झाला नाही ना असा आरोपही अनिल परब यांनी केला.

 

यावर फडणवीस म्हणाले की, अनिल परब यांनी मांडलेल्या भावनांशी मी सहमत आहे. महिलेची ओळख सांगता येत नाही. पोलिसांना या महिलेबाबत कळवले जाईल. सोमय्यांनीही पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. राजकारणात अनेकदा असे प्रसंग येतात ज्यामुळे संपूर्ण आयुष्य पणाला लागते. जर विरोधी पक्षाकडे काही तक्रारी असतील तर त्या आम्हाला द्या, आम्ही सखोल चौकशी करू, असे फडणवीस म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर