छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला फडणवीसांचा विरोध का? त्यांच्या मनात इतका द्वेष का?; संजय राऊत यांचा सवाल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला फडणवीसांचा विरोध का? त्यांच्या मनात इतका द्वेष का?; संजय राऊत यांचा सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला फडणवीसांचा विरोध का? त्यांच्या मनात इतका द्वेष का?; संजय राऊत यांचा सवाल

Nov 06, 2024 12:24 PM IST

Sanjay Raut slams devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वेष्टे आहेत. शिवरायांच्या मंदिराच्या संकल्पनेची खिल्ली उडवून त्यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतका द्वेष का?; संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतका द्वेष का?; संजय राऊत यांचा सवाल

Sanjay Raut slams devendra Fadnavis : ‘महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात दुखायला लागलं आहे. ते उद्धव ठाकरे यांच्या घोषणेची खिल्ली उडवत आहेत,’ असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 'फडणवीसांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतका द्वेष का,' असा सवालही त्यांनी केला आहे.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी शिवरायांचं मंदिर उभं करण्याची घोषणा केल्यानंतर फडणवीसांनी त्यांना टोला हाणला होता. आधी मुंब्र्यात मंदिर उभारा, असं ते म्हणाले होते. फडणवीसांच्या या टीकेचा संजय राऊत यांनी समाचार घेतला.

‘मुंब्राच काय, आम्ही पाकिस्तानातही शिवरायांचं मंदिर उभारू. फडणवीसांनी त्याची चिंता करू नये. फडणवीस कधी मुंब्र्याला गेले आहेत का? मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावरच शिवरायांचा भव्य पुतळा आहे. त्यांना ते बघायचं नाही. या देशातील मुस्लिमांना बदनाम करणं एवढंच त्यांचं काम आहे. 'बटेंगे तो कटेंगे’ हा फंडा चालत नसल्यामुळं आता त्यांनी हे उद्योग सुरू केले आहेत. ते शिवरायांच्या मंदिराची चेष्टा करत आहेत. शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या फडणवीसांनी पुन्हा एकदा शिवरायांचा अपमान केला आहे, असं राऊत म्हणाले.

फडणवीसांचे पूर्वज मुघलांचे गुलाम होते!

'देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वज मुघलांची गुलामी करत होते. महाराष्ट्राशी गद्दारी करत होते हा इतिहास तपासून पाहा. मराठ्यांच्या राज्यात तुमची फडणवीशी दाखवू नका. शिवरायांचं मंदिर उभारणार असं म्हटलं की तुम्हाला यातना होतायत. तुम्ही त्याची चेष्टा करताय. तुम्ही जरांगे पाटलांची चेष्टा करताय. मराठा आंदोलनाची चेष्टा करताय. तुम्ही बाळासाहेबांनी उभी केलेल्या शिवसेनेची चेष्टा करताय. याचं कारण तुमचं प्रेम महाराष्ट्रावर नसून गुजरातवर आहे. सुरतवर आहे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.

फडणवीस हा माणूस शिवरायांचा द्वेष्टा

'देवेंद्र फडणवीस हा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष्टा आहे. अखंड महाराष्ट्राचा द्वेष्टा आहे. शिवरायांची मंदिरं उभं राहतायत याची त्यांना लाज का वाटते? अशी माणसं महाराष्ट्रात आहेत आणि भाजप त्यांना पोसतोय, असं राऊत म्हणाले.

Whats_app_banner