Mumbai Local Train News: महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनेही निवडणुकीच्या काळात मतदारांच्या सोयीसाठी २० नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत विशेष उपनगरीय रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मध्य रेल्वेने वेळापत्रक जारी केले आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष:
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून (२० नोव्हेंबर) पहाटे ०३:०० वाजता सुटेल, कल्याण येथे पहाटे ४:३० वाजता पोहोचेल.
- कल्याण येथून (२० नोव्हेंबर) पहाटे ०३:०० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे (२० नोव्हेंबर) पहाटे ०४:३० वाजता पोहोचेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून (२० नोव्हेंबर) पहाटे ०३:०० वाजता सुटेल, पनवेल येथे पहाटे ०४:२० वाजता पोहोचेल.
- पनवेल येथून (२० नोव्हेंबर) पहाटे ०३:०० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे (२० नोव्हेंबर) पहाटे ०४:२० वाजता पोहोचेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून (२१ नोव्हेंबर) मध्यरात्री ०१:१० वाजता सुटेल, कल्याण येथे रात्री ०२:४० वाजता पोहोचेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून (२१ नोव्हेंबर) मध्यरात्री ०२:३० वाजता सुटेल, कल्याण येथे ०४:०० वाजता पोहोचेल.
- कल्याण (२१ नोव्हेंबर) मध्यरात्री ०१:०० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२:३० वाजता पोहोचेल.
- कल्याण येथून (२१ नोव्हेंबर) मध्यरात्री ०२:०० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३:३० वाजता पोहोचेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून (२१ नोव्हेंबर) मध्यरात्री ०१:४० वाजता सुटेल, पनवेल येथे ०३:०० वाजता पोहोचेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून (२१ नोव्हेंबर) मध्यरात्री ०२:५० वाजता सुटेल, पनवेल येथे ४:१० वाजता पोहोचेल.
- पनवेल येथून ०१:०० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२:२० वाजता पोहोचेल.
-पनवेल येथून ०२:३० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३:५० वाजता पोहोचेल.