शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हद्दच केली, वरळीत अधिक मतदान व्हावे म्हणून लढवली अशी शक्कल, गुन्हा दाखल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हद्दच केली, वरळीत अधिक मतदान व्हावे म्हणून लढवली अशी शक्कल, गुन्हा दाखल

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हद्दच केली, वरळीत अधिक मतदान व्हावे म्हणून लढवली अशी शक्कल, गुन्हा दाखल

Nov 21, 2024 05:05 PM IST

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात काल मतदान झाले. या निवडणुकीत राज्यात एकूण ६५.०२ टक्के मतदान झाले, जे विक्रमी आहे.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हद्दच केली, वरळीत अधिक मतदान व्हावे म्हणून लढवली अशी शक्कल
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हद्दच केली, वरळीत अधिक मतदान व्हावे म्हणून लढवली अशी शक्कल

MNS Fake Letter News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात काल (२० नोव्हेंबर) मतदान झाले. यावेळी आपल्या पक्षातील उमेदवारांचे मतदान वाढवण्यासाठी कार्यकत्यांकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, शिंदे गटाच्या उमेदवारांनी वरळीत आपल्या पक्षाला अधिक मतदान व्हावे, यासाठी मनसेचे लेटर हेड असलेले बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले, ज्यात मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. याप्रकरण शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे गटाच्या कार्त्यांकडून व्हायरल करण्यात आलेल्या या पत्रात असे लिहिण्यात आले आहे की, आपण आता विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपणांस मी सांगू इच्छतो की, शिवडी मतदारसंघात महायुतीने मनसे विरोधात उमेदवा न देऊन मनसेचा सन्मान केला आहे. त्याचेच दायित्व म्हणून मनसेने ठरविले आहे की, हिंदुंच्या मतांचे विभाजन रोखण्यासाठी वरळीत धनुष्यबाणाला पाठिंबा देऊन शिवसेनेला समर्थन देणार आहे. आपल्या मतांचा सन्मान करा आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान द्या. येत्या २० नोव्हेंबरला प्रत्येकाला घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावयाचा आहे.आपले प्रत्येक मोत अनमोल आहे', असेही आवाहन या पत्रातून करण्यात आले.

या पत्रावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सही आहे. मात्र, हे पत्र बनावट असल्याचे उघड झाले आहे. पत्राची सत्यता पडताळण्यासाठी संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी असे कोणतेही पत्र जाहीर केले नसल्याची माहिती दिली. याप्रकरणी मनसे कार्यकर्ते अक्रूर पाटकर यांनी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून शिंदे गटाचे कार्यकर्ते राजेश कुसळे यांच्याविरुद्ध बीएनएस कलम ३३६(२), ३३६(४), ३५३(२), आणि १७१(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी ६५.०२ टक्के मतदान झाले. दरम्यान, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वाधिक मतदान झाले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ६१.३९ टक्के मतदान झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी दहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोल्हापुरात सर्वाधिक ७६.२५ टक्के मतदान झाले. त्याखालोखाल गडचिरोलीत ७३.६८ टक्के, तर जालन्यात ७२.३० टक्के मतदान झाले आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर