Sharad Pawar : आपल्याशी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही! शरद पवारांचा दिलीप वळसेंना जाहीर इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : आपल्याशी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही! शरद पवारांचा दिलीप वळसेंना जाहीर इशारा

Sharad Pawar : आपल्याशी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही! शरद पवारांचा दिलीप वळसेंना जाहीर इशारा

Nov 14, 2024 01:23 PM IST

Sharad Pawar : शरद पवार म्हणाले,यांनी आता बोलायला काय ठेवलं आहे का?त्यांनी एकचं गोष्ट ठेवली,फक्त गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली,त्यांना शिक्षा द्यायची असते.

शरद पवारांचा दिलीप वळसेंना जाहीर इशारा
शरद पवारांचा दिलीप वळसेंना जाहीर इशारा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूमसुरू असून आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं आहे.राज्यातील बडे नेते वेगवेगळ्या मतदारसंघात प्रचारसभा घेऊन वातावरण ढवळून काढत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आंबेगावमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटलांचा गद्दार असा उल्लेख केला. दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली आणि जो गद्दारी करतो त्याला शिक्षा द्यायची असते,अशा शब्दांत शरद पवारांनी हल्लाबोल केला.

शरद पवार म्हणाले,यांनी आता बोलायला काय ठेवलं आहे का?त्यांनी एकचं गोष्ट ठेवली,फक्त गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांसोबत गणोजी शिर्केने गद्दारी केली,त्याला कधी सोडलं का?त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा असं शरद पवार म्हणाले.

आंबेगाव तालुक्याचं अन माझं एक अतूट नातं आहे. अगदी दिलीप वळसेंना इथून मी संधी देण्याआधी पासून माझं या तालुक्याशी संबंध येत गेलाय. दिलीप वळसेंना मी संधी दिली,ते आमदार झाले याचा मला आनंद होता. पुढं मी त्यांना मंत्री केलं. विविध पदं दिली. विश्वास ठेवला, संधी दिली. जे जे शक्य होतं, ते दिलं, असे पवार म्हणाले.

मी ज्यांना पदे दिली,शक्ती दिली,अधिकार दिला,सन्मान दिला यांच्याकडून मला काही नको. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत. मंत्रिमंडळात ते गेल्याचं जनतेला आवडलेलं नाही. आज ते म्हणतात आमचे आणि पवार साहेबांचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत,असं अजिबात नाही. माझी पत्नी वर्षातून एकदा भीमाशंकरला जाते, आता अलीकडेही भीमाशंकरला आली. मी विचारलं नेहमी सारखी व्यवस्था होती का? त्या म्हणाल्या यावेळी दिलीप वळसेंच्या घरी गेलीच नाही,थेट भीमाशंकर दर्शन घेऊन परतले.

“आता ते (वळसे पाटील) सांगतात की निवडणुका आल्या आहेत. शरद पवार मतदारसंघात येतील. मात्र, माझ्याबाबत काहीही बोलणार नाहीत. आता त्यांच्याबाबत काय बोलायचं? त्यांनी बोलायला काय ठेवलंय? त्यांनी बोलायला काहीही ठेवलेलं नाही. त्यांनी फक्त एकच गोष्ट केली, ती म्हणजे त्यांनी गद्दारी केली. जो गद्दारी करतो त्या गद्दाराला शिक्षा द्यायची असते. या विधानसभेच्या निवडणुकीत माझा तुम्हाला एकच शब्द आहे. या निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांना १०० टक्के पराभूत करा, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर