Maharashtra election results 2024 Live : राज्यात महायुतीला जनतेने दिला निर्विवाद कौल; विरोधकांचा दारुण पराभव
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election Results 2024 Live : राज्यात महायुतीला जनतेने दिला निर्विवाद कौल; विरोधकांचा दारुण पराभव
महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला, आठ वाजता सुरू होणार निवडणुकीची मतमोजणी
महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला, आठ वाजता सुरू होणार निवडणुकीची मतमोजणी

Maharashtra election results 2024 Live : राज्यात महायुतीला जनतेने दिला निर्विवाद कौल; विरोधकांचा दारुण पराभव

Ganesh Pandurang Kadam 12:11 PM ISTNov 23, 2024 05:41 PM
  • twitter
  • Share on Facebook

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. इथे पाहा पक्ष आणि मतदारसंघनिहाय निकालाचे अपडेट्स

Sat, 23 Nov 202412:11 PM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : राज्यात महायुतीला जनतेने दिला निर्विवाद कौल; विरोधकांचा दारुण पराभव

राज्यात महायुतीचा मोठा विजय झाला आहे. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. २०० पेक्षा अधिक जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून ६० जागाही जिंकू शकते नाहीत.

Sat, 23 Nov 202409:05 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : भाजपचे चंद्रकांत पाटील यांचा कोथरूड मधून दणदणीत विजय

 

पुण्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल १ लाख ११ हजार मतांनी दणदणीत विजयी मिळवला असून हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक मताधिक्य आहे.

Sat, 23 Nov 202408:57 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : माहीम मतदार संघातून अमित ठाकरे पराभूत; शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत यांचा विजय

माहीम मतदारसंघातून राज ठाकरे याचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला आहे. या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत हे जायंट किलर ठरले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांचा पराभव झाला आहे.

Sat, 23 Nov 202408:38 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे चेतन तुपे विजयी

पुण्यातील हडपसर मतदार संघातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे चेतन तुपे यांचा सहा हजार मतांनी विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांचा पराभव केला आहे.

Sat, 23 Nov 202408:26 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यतून भाजपचे उमेदवार राहुल कुल विजयी

 

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात विद्यमान आमदार व भाजपचे उमेदवार राहुल कुल यांचा विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रमेश थोरात यांचा पराभव केला आहे.

Sat, 23 Nov 202408:26 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : शिवाजीनगर मधून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे सुमारे ३६ हजार मतांनी विजयी

पुण्यातील शिवाजीनगर येथून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांचा विजय झाला आहे. त्यांचा सुमारे ३६ हजार मतांनी विजय झाला आहे. तर काँग्रेसचा उमेदवार परभुत झाला आहे.

Sat, 23 Nov 202408:22 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : संगमनेरमध्ये काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात पराभूत 

 

संगमनेर येथून धक्कादायक निकाल आला आहे. काँग्रेसचे बडे नेते व मुख्यमंत्री पदाचे दावेदार बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे.

Sat, 23 Nov 202408:15 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : माहीममधून अमित ठाकरे पिछाडीवर; उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला जायंट किलर!

दादर – माहीम विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या हाती येत असलेल्या कलांनुसार अमित ठाकरे प्रचंड पिछाडीवर आहेत.

Sat, 23 Nov 202407:59 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : पुणे जिल्ह्यातील खेड आळंदीमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाबाजी काळे विजयी

पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाबाजी काळे यांनी राष्ट्रवादी अजित पावर गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव केला आहे.

Sat, 23 Nov 202407:55 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : बोरवलीतून भाजपचे संजय उपाध्याय यांचा विजय

बोरवलीतून भाजप संजय उपाध्याय यांचा विजय झाला आहे. त्यांनी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय भोसले यांचा पराभव केला आहे.

Sat, 23 Nov 202407:46 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : अचलपूरमधून प्रहार संघटनेचे बच्चू कडू पराभूत

अचलपूर मतदारसंघातून बच्चूकडू यांचा पराभव झाला आहे. बच्चू कडू या मतदार संघातून सतत निवडून आले आहेत. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे.

Sat, 23 Nov 202407:44 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुनील कांबळे विजयी

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुनील कांबळे ७५ हजार ९९४ मते घेऊन रमेश बागवे यांचा सुमारे अकरा हजार मतांनी पराभव केलेला आहे. बागवे यांना ६४,७५७ मते इतकी मिळाले आहेत.

Sat, 23 Nov 202407:32 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बापू पठारे विजयी

पुण्यातील वडगाव शेरी मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बापू पठारे विजयी झाले आहे. त्यांनी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे यांचा पराभव केला आहे.

Sat, 23 Nov 202407:28 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : मावळ मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके विजयी

 

पुण्यातील मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे बंडखोर व अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचा पराभव केला आहे.

Sat, 23 Nov 202407:26 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ :  बारामतीमधून अजित पवार विजयी; युगेंद्र पवार यांचा पराभव

बामरामती मतदारसंघातून मोठी बातमी पुढे आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा पराभव केला आहे.

Sat, 23 Nov 202407:13 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक यांचा विजय; सतेज पाटलांना मोठा झटका

भाजपचे अमल महाडिक कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक आले आहे.

Sat, 23 Nov 202407:03 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : जालन्यात राजेश टोपे पिछाडीवर, तर हिकमत उढाण आघाडीवर

सहाव्या फेरी अखेरही राजेश टोपे पिछाडीवर गेले आहेत. घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढाण हे ६ हजार १०० मतांनी आघाडीवर आहेत. २५ वर्ष सलग आमदार राहिलेले राजेश टोपे पहिल्यांदा पिछाडीवर आहेत. ओबीसी आंदोलनाचा फटका बसला आहे.

Sat, 23 Nov 202407:00 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : पुण्यातील कसबा पेठ मतदार संघातून भाजपचे हेमंत रासने यांचा विजय; रवींद्र धंगेकर पराभूत

पुण्यातील कसबा पेठमतदार संघातील जायंट किलर ठरलेले कॉँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे. भाजपचे हेमंत रासने यांचा विजय झाला आहे.

Sat, 23 Nov 202406:46 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : जिंतूर विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजय भांबळे आघाडीवर

जिंतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार विजय भांबळे १४ व्या फेरी अखेर ४५७८ मतांनी आघडीवर आहेत.

Sat, 23 Nov 202406:37 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : कणकवलीमधून नीलेश राणे विजयी

कणकवली येथून नीलेश राणे विजयी झाले आहेत. परळीमधून धनंजय मुंडे आघाडीवर आहेत. हळूहळू निकालाचे चित्र आता स्पष्ट होत आहे.

Sat, 23 Nov 202406:34 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर आघाडीवर

पुण्यातील खडकवासला मतदार संघातून भाजपचे भीमराव तपकिर हे आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सचिन दोडके हे पिछाडीवर आहेत.

Sat, 23 Nov 202406:25 AM IST

हाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून सुनील टिंगरे आघाडीवर

पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून चौदावी फेरी झाली असून यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील टिंगरे हे आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे पिछाडीवर आहेत. सुनील टिंगरे एकूण ११ हजार २०४ मतांनी आघाडीवर आहेत.

Sat, 23 Nov 202406:25 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : मंगलप्रभात लोढा, रवी राणा बडनेरा मतदार संघातून विजयी, अमोल जावळे रावेळ मधून विजयी

भाजपचे मंगलप्रभात लोढा यांचा विजय झाला आहे. मलबार हिलमधून ते विजयी झाले आहे. तर बडनेरा मतदार संघातून रवी राणा यांचा विजय झाला आहे. तर रावेळ मधून अमोल जावळे यांचा विजय झाला आहे.

Sat, 23 Nov 202406:17 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : वरळीत आदित्य ठाकरे पिछाडीवर, मिलिंद देवरा आघाडीवर

 

वरळीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पिछाडीवर गेले आहे. ५९७ मतांनी आदित्य ठाकरे पिछाडीवर गेले आहेत. तर, मिलिंद देवरांनी आघाडी घेतली आहे.

Sat, 23 Nov 202406:03 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : देवेंद्र फडवणीस, गिरीश महाजन, अदिती तटकरे, कालिदास कोळंबकर यांचा विजय

नागपूर पश्चिम विधानसभा मतदार संघातून देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांचा श्रीवर्धन मतदारसंघातून विजय झाला आहे. तर वडाळा येथून कालिदास कोलंबकर यांचा विजय झाला आहे. तर भाजपचे गिरीश महाजन हे जामनेर मधून विजयी झाले आहेत.

Sat, 23 Nov 202405:57 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांचा श्रीवर्धन मतदारसंघातून विजय

 

श्रीवर्धन मतदार संघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांचा विजय झाला आहे.

Sat, 23 Nov 202405:52 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : महाराष्ट्रात भाजपचा स्ट्राइक रेट ८४ टक्के

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती विजयाकडे वाटचाल करत आहे. भारतीय जनता पक्षाचा स्ट्राइक रेट ८४ टक्के असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. त्याचवेळी शिवसेनेला ७१ टक्के आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ६२ टक्के मतं मिळाली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचाचा स्ट्राइक रेट १९.२ टक्के, शिवसेने उद्धव ठाकर गटाचा २०.६ टक्के, तर शदर पवार गटाचा ११.६ टक्के आहे.

Sat, 23 Nov 202405:52 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ :जयंत पाटील, रोहित पवार पिछाडीवर

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि रोहित पवार हे पिछाडीवर आहेत. शरद पवार गटाचे हे मोठे नेते आहेत.

Sat, 23 Nov 202405:39 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात अबू आसिम आझमी आघाडीवर

मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात समाजवाडी पक्षाचे अबू आसिम आझमी हे आघाडीवर आहेत. त्यांना सहाव्या फेरीअखेर २० हजार ४३२ मते मिळाली आहे. तर एमआयएमचे अतिक अहमद यांना २० हजार ५७ मते मिळाली आहेत. तर नवाब मलिक यांना १२ हजार ८८८ मते मिळाली आहे.

Sat, 23 Nov 202405:36 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद अनुशक्ती नगरमधून पिछाडीवर

अणुशक्ती नगर मतदारसंघातून उमेदवार सना मलिक हे आघाडीवर आहेत. अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद हे पिछाडीवर आहेत.

Sat, 23 Nov 202405:30 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधून दत्तात्रय भरणे आघाडीवर हर्षवर्धन पाटील मागे

पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हर्षवधन पाटील पिछाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे हे आघाडीवर आहेत.

Sat, 23 Nov 202405:23 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : पुण्यातील कसबा पेठेत हेमंत रासने आघाडीवर रवींद्र धंगेकर पिछाडीवर

पुण्यातील सर्वात चर्चेत राहिलेला मतदार संघ असलेल्या कसबा मतदार संघातून हेमंत रासने हे आघाडीवर आहेत. तर रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर आहेत. तर शिवाजी नगर मधून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे आघाडीवर आहेत.

Sat, 23 Nov 202405:13 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : देवेंद्र फडवणीसच होणार मुख्यमंत्री: प्रवीण दरेकर यांचं महत्वाचं विधान

राज्यातील जनतेने महायुतीला कल दिला आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याच्या दिशेने वाटचाल होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे मत भाजपचे प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे.

Sat, 23 Nov 202405:07 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालात गडबड, संजय राऊत यांनी व्यक्त केली शंका

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकालावर संजय राऊत यांनी या निकालावर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी निकालात गडबड झाली असल्याचं म्हटलं आहे.

Sat, 23 Nov 202404:58 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : भाजपची १११ जागांवर आघाडी; महायुतीची आघाडी २०० पार

राज्यात २८८ विधानसभा निवडणूक मतदारसंघात तब्बल १११ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तर एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचे देखील उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे महायुती सरकार स्थापनेच्या दिशेने वाटचाल करतांना दिसत आहे.

Sat, 23 Nov 202404:51 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बाळासाहेब थोरात पिछाडीवर

संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने अमोल खताळ हे येथून आघाडीवर आहेत. बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रिपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानले जात आहेत. मात्र बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर गेले आहेत.

Sat, 23 Nov 202404:45 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : महायुतीची बहुमताच्या दिशेने वाटचाल! १६० हून अधिक जागांवर आघाडी

महायुतीने तब्बल १६० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. आता पर्यंत झालेल्या फेरीत महायुती आघाडीवर आहे. तर मविआने १०० आकडाही पार केला नाही. त्यामुळे महायुतीने बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे दिसत आहे.

Sat, 23 Nov 202404:45 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : पुण्यातील आठ मतदारसंघात महायुती आघाडीवर

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, कसबा या चार मतदारसंघात भाजप आघाडीवर आगे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चेतन तुपे हे हडपसरमधून आघाडीवर आहेत. वडगाव शेरी येथून सुनील टिंगरे आघाडीवर आहेत. तर पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये काँग्रेसचे रमेश बागवे आघाडीवर आहेत. खडकवासल्यामध्ये तुतारीचे सचिन दोडके पुन्हा आघाडीवर आहेत.

Sat, 23 Nov 202404:45 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : भोर वेल्हा मुळशी मतदार संघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शंकर मांडेकर आघाडीवर

पुण्यातील भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शंकर मांडेकर हे आघाडीवर आहेत. त्यांना १८३७४ मते मिळाली आहे. तर त्यांचे विरोधी कॉँग्रेसचे संग्राम थोपटे हे मागे आहेत. त्यांना केवळ ७४३७ मते मिळाली आहेत. संग्राम थोपटे हे सलग तीन वेळा निवडणूक आले आहेत.

Sat, 23 Nov 202404:45 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : वांद्रे पूर्वमध्ये ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत तर झिशान सिद्दिकी ६६२ मतांनी पिछाडीवर आहेत.

वांद्रे पूर्व मतदार संघांत ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत. त्यांनी ६६२ आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत झिशान सिद्धीकी यांना २१२९ मते मिळाली आहे तर वरूण सरदेसाई यांना २७२९ मते मिळाली आहे,

Sat, 23 Nov 202404:45 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : शिवडीत अजय चौधरी काही मतांनी आघाडीवर

मुंबईतील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या शिवडी मतदारसंघाच्या लढतीत शिवसेना ठाकरे गट आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर पिछाडीवर आहेत.

Sat, 23 Nov 202404:45 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर आहेत.

पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर आहेत. सिद्धार्थ शिरोळे यांना ८२९८ मते मिळाली आहे. तर कॉँग्रेसचे दत्ता बहिरट हे ४४४० मतांनी आघाडीवर आहेत.

Sat, 23 Nov 202404:45 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ : येवला मतदार संघात छगन भुजबळ किरकोळ मतांनी आघाडीवर 

येवला मतदार संघातून छगन भुजबळ हे काही मतांनी पुढे आले आहेत.  छगन भुजबळ हे मागे पडले होते. मात्र, आता ते पुढे आले आहेत. 

Sat, 23 Nov 202404:00 AM IST

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि विश्वजित कदम हे पिछाडीवर असल्याचे सुरुवातीच्या फेरीतून समोर आले आहे.

Sat, 23 Nov 202403:59 AM IST

कर्जत-जामखेड पहिली फेरीत रोहित पवार आघाडीवर

कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार हे आघाडीवर आहे. त्यांना ५५७७ मते मिळाली आहे. तर भाजपचे प्रा राम शिंदे यांना ५२८९ मते मिळाली असून ते २८८ मतांनी मागे आहेत.

Sat, 23 Nov 202403:55 AM IST

बारामतीत अजित पवारांची आघाडी, तब्बल ३ हजार ६२३ मतांनी युगेंद्र पवार मागे

 बारामतीत  पहिल्या फेरीत अजित पवारांना ९२९१ मतं, तर युगेंद्र पवारांना ५६६८  मतं मिळाली आहे. तब्बल ३  हजार ६२३  मतांनी अजित पवार आघाडीवर आहेत.

Sat, 23 Nov 202403:53 AM IST

कसबा पेठेत रवींद्र धंगेकर पिछाडीवर

 

पुण्यातील कसबा पेठेत रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर आहेत. भाजपचे रासने हे पुढे आले आहे. थोड्या वेळापूर्वी धंगेकर हे आघाडीवर होते. मात्र, रासने यांनी आघाडी घेलती आहे.

Sat, 23 Nov 202403:51 AM IST

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील आघाडीवर

पुण्यातील कोथरूड येथून भाजपचे चंद्रकांत पाटील हे पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. त्यांना ८१०१ मत मिळाली आहे. तर त्यांचे विरोधक चंद्रकांत मोकाटे यांना २३५२ मते मिळाली आहे. तर किशोर शिंदे यांना ५२९ मते मिळाली आहे. पाटील यांचे मताधिक्य ५७४९ मिळाले आहे.

Sat, 23 Nov 202403:46 AM IST

महाराष्ट्र निवडणूक २०२४ निकाल : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेचे संजय शिरसाट पिछाडीवर

छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट हे पिछाडीवर आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर संजय शिरसाट हे सुरुवातीपासून त्यांच्यासोबत होते व ठाकरेंच्या शिवसेनेवर आक्रमकपणे टीका करत होते.

Sat, 23 Nov 202403:43 AM IST

Kalwa Mumbra Election Result : कळवा-मुंब्रा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांची आघाडी

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर अजित पवार गटाच्या नजीब मुल्ला यांचं आव्हान आहे.

Sat, 23 Nov 202403:36 AM IST

Kagal Election Result : कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का, समरजित घाटगे आघाडीवर

कोल्हापूरमधील कागल मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ पिछाडीवर गेले आहेत. तिथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समरजित घाटगे यांनी आघाडी घेतली आहे. शरद पवार यांनी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. तिथल्या अंतिम निकालाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

Sat, 23 Nov 202403:34 AM IST

Maharashtra Election results : परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आघाडीवर

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व मंत्री धनंजय मुंडे हे २ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

Sat, 23 Nov 202403:29 AM IST

Kolhapur north election results :  कोल्हापूर उत्तरमध्ये अपक्ष राजेश लाटकर आघाडीवर

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार राजेश लाटकर हे आघाडीवर आहेत. मधुरिमाराजे भोसले यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर महाविकास आघाडीनं लाटकर यांना पाठिंबा दिला होता.

Sat, 23 Nov 202403:27 AM IST

Worli Election results : वरळीत आदित्य ठाकरे आघाडीवर, तर, येवल्यात छगन भुजबळ यांना धक्का

मुंबईतील वरळी मतदारसंघातून माजी मंत्री व ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत. तर, येवल्यात छगन भुजबळ यांना धक्का बसला आहे. ते पिछाडीवर गेले आहेत.

Sat, 23 Nov 202403:22 AM IST

Maharashtra Election counting : ईव्हीएम मतमोजणी सुरू, कल बदलण्यास सुरुवात

ईव्हीएमवरील मतांची मोजणी सुरू झाली असून कल वेगानं बदलण्यास सुरुवात झाली आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांनी पुन्हा आघाडी घेतली आहे. तर, कणकवली व कुडाळमध्ये नीतेश राणे व नीलेश राणे हे दोघेही आघाडीवर आहेत.

Sat, 23 Nov 202403:17 AM IST

Ambegaon Election Result : आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील पिछाडीवर, निकम यांची आघा

 

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील पिछाडीवर गेले आहेत. तिथं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त निकम यांनी आघाडी घेतली आहे.

Sat, 23 Nov 202403:07 AM IST

Ghatkopar East Election Result : घाटकोपर पूर्वमध्ये भाजपचे पराग शाह आघाडीवर

मुंबईतील घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे पराग शाह आघाडीवर आहेत. पराग शाह हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांचं आव्हान आहे.

Sat, 23 Nov 202403:04 AM IST

Baramati Election result : बारामतीमध्ये अजित पवारांना धक्का, युगेंद्र पवार आघाडीवर

पोस्टल मतमोजणीत बारामती मतदारसंघात अजित पवार यांना धक्का बसला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी आघाडी घेतली आहे.

Sat, 23 Nov 202403:01 AM IST

Mahim Election Result : माहीममध्ये अमित ठाकरे आघाडीवर

मुंबईतील माहीम मतदारसंघातून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे आघाडीवर आहेत. सदा सरवणकर व महेश सावंत यांचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

Sat, 23 Nov 202403:01 AM IST

Sawantwadi election result : सावंतवाडीत राजन तेली आघाडीवर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजन तेली आघाडीवर आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे.

Sat, 23 Nov 202402:55 AM IST

पहिला ट्रेंड आला, पुण्यातून भाजप पुढे

Maharashtra Election Live : पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, पुणे कॅन्ट जागेवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपच्या सुनली कांबळे यांनी आघाडी घेतली आहे. याशिवाय गोंदिया आणि चिरोलीमधून काँग्रेस आघाडीवर आहे.

Sat, 23 Nov 202402:55 AM IST

अहमदनगरमधून राष्ट्रवादी पुढे

Maharashtra Election Live : राष्ट्रवादीचे कमलकर अहमदनगर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात महायुती पाच जागांवर तर महाविकास आघाडी पाच जागांवर आघाडीवर आहे. तर झारखंडमध्ये एनडीए पाच जागांवर तर जेएमएम-काँग्रेस आघाडी तीन जागांवर पुढे आहे.

Sat, 23 Nov 202402:50 AM IST

महाराष्ट्रात महायुती १५ जागांवर तर एमव्हीए १२ मतदारसंघात आघाडीवर

Maharashtra Election Live : महाराष्ट्रात आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार, महाविकास आघाडी १२ जागांवर तर महायुती १५ जागांवर आघाडीवर आहे. झारखंडमध्ये काटे की टक्कर सुरू आहे. सुरू आहे. पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत झारखंडमध्ये दोन्ही आघाडी प्रत्येकी १० जागांवर पुढे आहेत. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपापल्या जागेवरून आघाडीवर आहेत.

Sat, 23 Nov 202402:47 AM IST

काँग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना पटोले आघाडीवर

काँग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना पटोले आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे यूगेंद्र पवार आघाडीवर आहे.

Sat, 23 Nov 202402:44 AM IST

कागल मध्ये समरजीत घाडगे आघाडीवर, हसन मुश्रीफ पिछाडीवर

Kolhapur kagal update : कोल्हापूर मधील कागल येथील अपडेट पुढे आले आहेत. कागल येथून  समरजीत घाडगे आघाडीवर आहेत तर हसन मुश्रीफ पिछाडीवर असल्याची माहीती आहे.  

Sat, 23 Nov 202402:42 AM IST

बारामतीमध्ये पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर

Baramati Election Update : बारामतीयेथील पहिला निकाल हाती आला असून यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार पुढे असल्याची माहिती आहे. सध्या पोस्टल मतदान सुरू झाले आहेत.

Sat, 23 Nov 202402:38 AM IST

मतमोजणी सुरु, पहिला कल भाजपाच्या बाजूने

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. हाती आलेल्या निकालानुसार भाजपा आघाडीवर असल्याची माहिती आहे. सातारा जिल्ह्यातील शिवेंद्रराजे भोसले आणि नागपूर दक्षिण पश्चिममधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत.

Sat, 23 Nov 202402:29 AM IST

थोड्याच वेळात सुरू होणार मतदान; आधी पोस्टल मतांची होणार मतमोजणी 

Maharashtra Election Result 2024 Live: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू करेल. पोस्टल मतपत्रिका आधी मोजल्या जातील. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) उघडली जातील. राज्यातील एकूण विधानसभा मतदारसंघाची संख्या २८८ आहे.

थोड्याच वेळात सुरू होणार मतदान; आधी पोस्टल मतांची होणार मतमोजणी
थोड्याच वेळात सुरू होणार मतदान; आधी पोस्टल मतांची होणार मतमोजणी
Sat, 23 Nov 202402:25 AM IST

ठाकरेंच्या शिवसेनेचे शिंदे गटावर आरोप

Maharashtra Election Result: ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा जागेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार केदार दिघे यांनी शुक्रवारी मतदानोत्तर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप केला, ज्यामध्ये मतदान साहित्य निरीक्षण कक्षात ठेवण्या ऐवजी 'स्ट्राँग रूम'मध्ये ठेवण्यात आले होते. दिघे म्हणाले, 'पोस्टल बॅलेट असलेल्या लिफाफ्यांना सीलबंद केले नव्हते. निवडणूक आयोगाने या गैरप्रकारांची चौकशी करून कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. त्यांनी त्या जागेवर फेरमतदान घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Sat, 23 Nov 202402:25 AM IST

राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा रंगला राजकीय सामना

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील राजकीय लढत प्रामुख्याने सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्यात आहे. एकीकडे, महाआघाडीत भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT), ज्येष्ठ नेते शरद पवार यांची NCP (SP) आणि काँग्रेस हे आहेत.

Sat, 23 Nov 202402:22 AM IST

महाविकास आघाडीचा आमदारांवर राहणार वॉच

Maharashtra Election Result : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदार फुटू नये याची काळजी घेतली आहे. सर्व आमदारांवर वॉच ठेवला जाणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी सांगितले की, महाविकास आघाडी (एमव्हीए) च्या घटक पक्षांनी महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना एकत्र ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार स्थापनेपूर्वी आमदार फूटीचा कोणताही प्रयत्न हाणून पाडणे हा या पाऊलाचा उद्देश आहे, असे राऊत म्हणाले.

Sat, 23 Nov 202402:20 AM IST

महाराष्ट्रातील २०१९ च्या निवडणुका झाल्या होत्या चुरशीच्या

Maharashtra Election Result : २०१९ मध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. मात्र, शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून फुट पडल्याने महायुतीत दुभंगली होती. त्यामुळे शिवसेनेने महाविकास आघाडीत सहभागी होत सरकार स्थापन केलं. मात्र, काही वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. यामुळे शिवसेनेत फुट पडून पक्ष दोन गटात विभागला गेला. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ देत मुख्यमंत्री पदाची शपथ घेत भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडलं.

Sat, 23 Nov 202402:13 AM IST

महाविकास आघाडीचा १६० हून अधिक जागांवर विजयाचा दावा

Maharashtra Election Result: महाविकास आघाडीच्या नेत्यांनी १६० पेक्षा जागा जिंकण्याचा विश्वास वर्तवला आहे. शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी २८८ पैकी १६० ते १६५ जागा महाविकास आघाडी जिंकेल आणि राज्यात स्थिर सरकार देईल, असा विश्वास व्यक्त केला. राऊत पत्रकारांना म्हणाले, 'आम्ही आणि आमचे मित्र पक्ष, शेकाप, समाजवादी पक्ष, डावे पक्ष यासारख्या छोट्या पक्षांसह बहुमताचा आकडा पार करत आहोत. आम्ही १६०-१६५ जागा जिंकणार आहोत. राज्यात स्थिर सरकार येईल. हे मी मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो.

Sat, 23 Nov 202402:10 AM IST

सुषमा अंधारेंनी ट्विट करत मुख्यमंत्री शिंदेंना त्यांच्या वक्तव्याची करून दिली आठवण

Maharashtra Election Result: सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या त्यांच्या जुन्या व्यक्तव्याबद्दल आठवण करून दिली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ट्विट केले आहे. या त्यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत असलेल्या ५० आमदारांपैकी एकही जण पडणार नाही, तसे झाल्यास मी राजकारण सोडेन असं म्हटलं होतं. याच वक्तव्याची सुषमा अंधारे यांनी आठवण करून दिली आहे.

Sat, 23 Nov 202401:55 AM IST

Maharashtra Election 2024 results : राज्यातील मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर

राज्यातील सर्व मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. मतमोजणी केंद्रातील सर्व कार्यवाही कव्हर केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सर्व केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा कवच असेल.

Sat, 23 Nov 202401:51 AM IST

Maharashtra Election results 2024 : राज्यात एकूण २८८ मतमोजणी केंद्रे

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी २८८ मतमोजणी केंद्रे असून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी १ मतमोजणी केंद्र असेल.

Sat, 23 Nov 202401:53 AM IST

Maharashtra Election results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी

महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मशिनमधील मतदानाची मोजणी होईल.