महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यात भाजपप्रणित महायुतीची लाट आल्याचं पाहायला मिळालं. महायुतीने २३५ जागा जिंकून निर्विवाद यश मिळवलं आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटानेही ५७ जागा जिंकत मोठा विजय मिळवला. २०२२ शिवसेनेत बंड झाल्यानंतर ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ देत सुरत मार्गे गुवाहाटी गाठली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदारांसह शिंदे गटाचे आणखी काही नवीन आमदारही निवडून आले आहेत. मात्र त्यावेळी शिंदे यांना साथ देणाऱ्या काही आमदारांना पराभवाचा धक्का बसला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या पदरात मतदारांनी भरभरून दान दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ५७ जागा जिंकत दमदार विजय़ मिळवत खरी शिवसेना आपलीच हा दावा आणखी मजबूत केला आहे. मात्र शिवसेनेतील फुटीवेळी साथ देणाऱ्य़ा दोन अपक्षांसह पाच आमदारांना पराभवाचा धक्का बसला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना ४० आमदारांनी साथ दिली होती. मात्र त्यापैकी ५ आमदारांवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे.