शरद पवार भाषणाला उभे राहताच सुरू झाला पाऊस; म्हणाले, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शरद पवार भाषणाला उभे राहताच सुरू झाला पाऊस; म्हणाले, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार!

शरद पवार भाषणाला उभे राहताच सुरू झाला पाऊस; म्हणाले, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार!

Nov 15, 2024 05:05 PM IST

Sharad Pawar : माझा, जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध नाही. परंतु पावसाच्या सभेत मीभाषण केल्यानंतर निकाल चांगला लागेल, असा विश्वास शरद पवार यांनी इचलकरंजीत व्यक्त केला आहे.

शरद पवार
शरद पवार

महाराष्ट्रातनिवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून गाठीभेटी, रोड शो, प्रचारसभांना चांगलाच जोर आला आहे. प्रचारासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक राहिल्याने तसेच त्यातील तीन दिवस सुट्टीचे असल्याने प्रचाराचा धुरळा उडणार आहे. शरद पवारांची आज इचलकंरजी येथे जाहीर सभा झाली. मात्र सभा सुरू होताच जोरदार पावसास सुरूवात झाली.महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. माझा, जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध नाही. परंतु पावसाच्या सभेत मीभाषण केल्यानंतर निकाल चांगला लागेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

२०१९ मध्ये सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची पावसातील सभा संस्मरणीय झाली होती. या सभेने साताऱ्यात उदयनराजे यांचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये शरद पवार यांनी पावसात भिजत भाषण दिले होते, याचे फोटो आजही अनेकांच्या लक्षात आहेत. साताऱ्यातील त्या सभेचं सर्वत्र कौतुक झाले. सोशल मीडियात शरद पवारांचा फोटो ट्विटरवर ट्रेंडमध्ये आले होते.पायाला दुखापत होऊनहीशरद पवारांनी पावसात केलेल्या सभेचं सोशल मीडियावर कौतुकझालं होतं.

त्या सभेनंतर शरद पवार तरुणाईमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. पावसाची संततधार सुरू असूनही शरद पवार भाषण देण्याचे थांबले नव्हते. शरद पवार भर पावसात सभा घेत असल्याचं पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. त्यांच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. तसेच काहीसे वातावरण इचलकरंजीत पाहायला मिळाले. सभास्थळी पावसाची रिमझिम सुरू झाली. त्यावेळी पवार भाषणाला उभे राहताच त्यांनी पाऊस आणि आपले भाषण यांच्या योगायोगावरून विनोदी शैलीत भाष्य केले.

इचलकरंजीतील सभेत शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात मी सभेला बोलायला उभा राहिलो तर पावसाची सुरुवात होते.पावसात मी भाषण केल्यानंतरनिवडणुकीचा निकाल चांगला लागतो. मध्यंतरी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. ज्यांच्या हातात आपण महाराष्ट्राची सत्ता दिली त्यांचा ५ वर्षाचा अनुभव बघितला तर सत्तेत बदल केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही.

सत्तेत बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी करण्याचे काम आपल्याला येत्या २० तारखेला करायचं आहे. भरपावसात तुम्हीसभेला आलात, आमची भूमिका समजून घेण्याची तयारी केली त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद, असं म्हणत पवारांनी पावसामुळं ही सभा १० मिनिटात उरकली.

Whats_app_banner