Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. अनेक जागांवर उमेदवार बदलाच्या सत्रानंतर अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर आता महायुती व महाविकास आघाडीचे फायनल जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले आहे. मविआने छोट्या मित्रपक्षांना ८ जागा सोडल्याअसून राज्यातील सहा ठिकाणी मविआतील घटक पक्षांमध्येच सामना आहे.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी संपली. अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशीच्या अखेरच्या काही तासांपर्यंत महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवारी याद्या प्रसिद्ध करणे काही ठिकाणी उमेदवार बदलण्याचे काम सुरू होते.
दोन्ही आघाडी, युतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेते गुऱ्हाळ इतके प्रदीर्घ चालले की,शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार याद्या प्रसिद्ध केल्या जात होत्या. मात्र, शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसल्याचे दिसत आहे. कारण महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी ६ ठिकाणी दोन-दोन उमेदवार दिले आहेत.
महाविकास विकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धव ठाकरे या प्रमुख तीन पक्षांच्या मिळून २८५ जागा होतात. यात६ठिकाणी दोन पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. म्हणजे २८० जागांवर हे तीन पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. उर्वरित ८ जागा छोट्या मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत.
काँग्रेस – १०२ जागा
शिवसेना (UBT) - ९६
राष्ट्रवादी (SP) - ८६
समाजवादी - ०२
शेतकरी कामगार पक्ष -०२
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना अंदाज असल्याने आपापल्या उमेदवाराकडे एबी फॉर्म पोहोचवण्याची व्यवस्था केली होती. मात्र यामुळे सहा ठिकाणी दोन-दोन उमेदवार झाले आहेत. आता या जागांवर कोण माघार घेते किंवा मैत्रिपूर्ण लढत होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
संबंधित बातम्या