मतं मिळवण्यासाठी 'दादा'गिरी? युनिट चालवायचं का नाय..., अजित पवारांचा कारखान्यातला VIDEO आव्हाडांकडून शेअर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मतं मिळवण्यासाठी 'दादा'गिरी? युनिट चालवायचं का नाय..., अजित पवारांचा कारखान्यातला VIDEO आव्हाडांकडून शेअर

मतं मिळवण्यासाठी 'दादा'गिरी? युनिट चालवायचं का नाय..., अजित पवारांचा कारखान्यातला VIDEO आव्हाडांकडून शेअर

Nov 10, 2024 03:44 PM IST

Ajit Pawar Video : एका कारखान्यात बोलताना अजित पवार दादागिरी करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ शेअर करताना केला आहे. हा व्हिडिओ श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील असल्याचा दावाही जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

मतं मिळवण्यासाठी 'दादा'गिरी?
मतं मिळवण्यासाठी 'दादा'गिरी?

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पारा तापत असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. Jitendra awhad shared video alleges ajit pawar‘इथ जरी कुणाचही युनिट असलं तरी पुढं चालवायचं की नाय चालवायचं ह्याबाबत मी बरच काही करू शकतो’, असं अजित पवार म्हणाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

या व्हिडिओमध्ये अजित पवार म्हणताना दिसते की,‘मला तुमची साथ हवी आहे. कुणाच्या दबावाला घाबरायची गरज नाही. आधी रामराजे यांचं ऐकलं आता माझं ऐकावं अशी विनंती आहे. इथ जरी कुणाचही युनिट असलं तरी पुढं चालवायचं की नाय चालवायचं ह्याबाबत मी बरच काही करू शकतो…. बोला… दबाव आहे का तुमच्यावर?’,असा सवाल अजित पवारांनी विचारल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सोबत जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.

जितेंद्र आव्हाडांची सोशल मीडिया पोस्ट -

*अजित पवारांची
दादागिरी नही चलेगी नही चलेगी

(शेअर करण्यात आलेला व्हिडिओ श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील असल्याची सूत्रांची माहिती)

मला तुमची साथ हवी आहे. कुणाच्या दबावाला घाबरायची गरज नाही. आधी रामराजे यांचं ऐकलं आता माझं ऐकावं अशी विनंती आहे. इथ जरी कुणाचही युनिट असलं तरी पुढं चालवायचं की नाय चालवायचं ह्याबाबत मी बरच काही करू शकतो…. बोला… दबाव आहे का तुमच्यावर?

स्वस्त सिलेंडरसह महिलांना देणार ३००० रुपये, जातीय जनगणेचे आश्वासन! महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

कामगार- तुमच्या सहकार्याने आणि मदतीने बंद असलेला साखर कारखाना त्यांनी सूरू केला.
अजित पवार - हे साफ चुकीचं आहे. धारुला नीट विचारा कुणी काय मदत केली ते. तिकडं सगळी सुत्र आम्ही हलवली. मला बरंच काही करता आलं असतं. कुणी म्हणत होतं धारूने नाही अजित पवारने कारखाना घेतला. शेजारी असणारा शरयू कारखाना माझ्या बंधूने घेतला…… त्यावेळीं *ह्या कारखान्याबाबत माझ्याकडे सुद्धा ऑफर आली होती. त्यावेळीं सगळं काही झालं होतं परंतु माझ्या माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याच याच परिसरात युनिट असल्यामुळे मी काही केलं नाहीं* . परंतु *आता मी जर काही गंमत करायची ठरवली तर खूप काही करू शकतो. परत तुम्ही रडत माझ्याकडे याल…चूक झाली आमचा गैरसमज झाला म्हणुन…. मी एकतर कुणाच्या नादाला लागत नाही* तुम्हाला कुणालातरी मतदान करायचं आहे.
 

*कदाचित तुम्हाला काही वाटत असेल तर ठिक आहे. मला तर माझी जागा निवडून आणायची आहे. त्यासाठी जिवाचं रान करायचं आहे. परंतु नंतर अशी वेळ येईल की त्यावेळीं तुमच्या डोळ्यात पाणी येईल तुम्ही काहीच करू शकणार नाही. मग मी धारूच सुद्धा ऐकणार नाही.*अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून केली आहे.

Whats_app_banner