Maharashtra Vidhan Sabha Election Results: राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. त्यामुळे त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्ता स्थापन करण्याचा हालचाली सुरू झाल्या असून उद्या नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवे सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया काय असते? सरकार कसे स्थापन होते? सत्ता स्थपणेचा दावा कासा केला जातो याची माहिती घेऊयात.
विधानसभा निवडणुक २०२४ चे निकाल शनिवारी जाहीर झाले. यात महायुतीने २२६ जागांवर विजय मिळवला आहे. यात भाजपने १३२ जागांवर तर ५७ जागांवर एकनाथ शिंदेच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरला असून तिन्ही पक्ष एकत्र बसून या बाबत निर्णय घेणार आहेत. त्या आधी सत्ता स्थापनेचा दावा महायुती करणार आहे.
राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळं महायुतीकडून सरकारस्थापनेचा दावा केला जाणार आहे. या पूर्वी सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून केंद्रीय निरीक्षकाची नेमणूक केली जाईल. केंद्रीय निरीक्षक नेमणूक झाल्यावर भाजपच्या पदाधीकाऱ्यांची बैठक होईल. या बैठकीत भाजपचा गटनेता निवडला जाईल. गटनेता निवडीनंतर भाजपा गटनेते राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा करतील. यानंतर राज्यपाल सरकार स्थापनेचे निमंत्रण महायुतीला देतील. त्यानंतर बहुमत चाचणी होईल. मात्र, सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे त्यांना सरकार स्थापन करण्यास कोणतीही अडचण होणार नाही.
मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. विधीमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीहून केंद्रीय भाजपकडून २ निरीक्षक पाठवले जाणार असून ते विधीमंडळ नेता निवडणार आहे. यानंतर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करतील. राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे पत्र दिल्यानंतर भाजप सत्ता स्थापन करण्यासतही पुढाकार घेणार आहे, अशी माहिती आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसपक्ष आज गटनेत्याची निवड करणार आहे. अजित पवार पक्षाच्या विधीमंडळ नेत्यांची बैठक अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक होणार आहे. या बैठकीत गटनेत्याची निवड केली जाणार आहे.