karjat Assembly constituency : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं असून उमेदवार व उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे.सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु असताना काही ठिकाणी आचारसंहिता उल्लंघनाचेप्रकार समोर येत आहेत. कर्जत मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीईव्हीएमबाबत अपप्रचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
कर्जत मतदारसंघातीलशिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्याने ईव्हीएमची माहिती देतानाफक्त पहिल्या क्रमांकाचे बटणसुरू असून तेच दाबा, बाकीचीबटणे खराब असल्याचेआवाहन मतदारांना केले आहे. या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाअसून यावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेनाठाकरे गटाने आता या सगळ्या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखलकरून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कर्जतमध्ये विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्यांकडून डमी ईव्हीएम मशिन दाखवून पहिल्या क्रमांकाचे बटन दावा असं आवाहन एक कार्यकर्ता करताना दिसत आहे. शिंदे गटाकडून ईव्हीएमबाबत अपप्रचार केला जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.महत्त्वाचे म्हणजे आदिवासी पाड्यांमध्ये हा सगळा प्रचार केला जात असल्याचे म्हटलं जात आहे. व्हिडीओतील व्यक्ती ईव्हीएमची इतर बटणे खराब असल्याचेही सांगत आहे. अय्युब तिवले असे या कार्यकर्त्याचे नाव असून त्याच्याविरोधात ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. अय्युब तिवले हा महेंद्र थोरवे यांचा कार्यकर्ता असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
ईव्हीएमचे केवळ पहिल्या क्रमांकाचे बटण सुरू असून बाकीची बटणं बंद आहेत. त्यामुळे फक्त एक नंबरचं बटण दाबा. त्यामुळे ठाकरे गटाने या सगळ्या प्रकाराविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
दरम्यान, याआधी महेंद्र थोरवे हे अपक्ष उमेदवाराच्या ७५ वर्षीय वृद्ध कार्यकर्त्याला धमकावत असल्याचाही व्हिडीओ समोर आला होता. थोरवे यांची कर्जतच्या कडाव बाजारपेठेत प्रचार रॅली निघाली असताना अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा प्रचार करणाऱ्या ७५ वर्षीय मनोहर पाटील यांना महेंद्र थोरवे यांनी धमकी दिली. तुला पुराच करतो, तुला पुरा नाही केला तर नाव नाही सांगत, असं थोरवे यांनी म्हटलं होतं.