पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहव अन्य केंद्रीय पातळीवरील नेते महाराष्ट्रात येऊन महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.याच महायुतीच्या उमेदवारांमध्ये नवाब मलिकही उमेदवार आहेत, ज्यांच्यावर भाजपाने दाऊदशी संबंध असल्याचे आरोप करुन जेलमध्ये टाकले होते. सत्तेसाठी उद्या भाजपा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला निवडणुकीत उभे करेल तर त्याला काय सत्ता जिहाद म्हणायचे का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
महाराष्ट्रात निवडणुकीचे रण चांगलेच तापू लागलं आहे. योगी आदित्यनाथ यांच्या बटोगे तो कटोगे या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक है ते सेफ है घोषणा दिली. त्यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी टीका करत म्हटले की, भाजपाचे नेते ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ है’, ‘व्होट जिहाद’ यासारख्या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्माच्या आधारावर फूट पाडत आहेत. लोकशाही व संविधान मान्य नसणारा भाजपा ‘व्होट जिहाद’चा नारा देऊन मतदारांचा अपमान करतअसल्याचाहल्लाबोलनाना पटोले यांनी केला आहे.
आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस मविआचे उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारासाठी घाटंजी येथील सभेतनाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.
इंदिरा गांधी स्वतः आल्या, तरी कलम ३७० परत येणार नाही -
धुळ्यातील सभेत बोलताना अमित शहा म्हणाले, राहुल गांधी म्हणतात, आम्ही काश्मिरात कलम ३७० परत आणू, असा त्यांनी प्रस्ताव विधानसभेत मंजूर केला आहे. राहुल गांधी, आपण तर सोडाच, पण इंदिरा गांधी स्वतः जरी स्वर्गातून परत आल्या, तरी कलम ३७० परत येणार नाही. काश्मीर भारताचे अभिन्न अंग आहे. ते आमच्यापासून कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही.
शहा म्हणाले, काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना सर्व उलेमा भेटले आणि म्हणाले, मुस्लिमाना आरक्षण द्यायला हवे. बंधू-भगिनींनो, जर मुसलमानांना आरक्षण द्यायचे असेल तर, एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणातून कापून द्यावे लागेल. मात्र राहुल गांधी कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी जरी आली तरीही मुस्लिमांना आरक्षण देऊ शकणार नाही.
काँग्रेसने तुष्टीकरणाचे राजकारण केले. मी आज आपल्याला विचारण्यासाठी आलो आहे की, काश्मीर आपले आहे की नाही?