Assembly Election : निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील विक्रोळीमध्ये कॅश व्हॅनमध्ये सापडल्या साडे सहा टन चांदीच्या विटा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Assembly Election : निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील विक्रोळीमध्ये कॅश व्हॅनमध्ये सापडल्या साडे सहा टन चांदीच्या विटा

Assembly Election : निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील विक्रोळीमध्ये कॅश व्हॅनमध्ये सापडल्या साडे सहा टन चांदीच्या विटा

Nov 10, 2024 08:20 PM IST

विक्रोळीत पोलिसांनी व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला एका कॅश व्हॅनमध्येसाडे सहा टनचांदीच्या विटासापडल्याने खळबळ माजली आहे.

विक्रोळीमध्ये कॅश व्हॅनमध्ये सापडल्या साडे सहा टन चांदीच्या विटा
विक्रोळीमध्ये कॅश व्हॅनमध्ये सापडल्या साडे सहा टन चांदीच्या विटा

silver  bricks found In Mumbai : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राज्यभरात मोठा पोलीस  बंदोबस्त  तैनात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पोलीस तपासणीत मोठ्या प्रमाणात रोखड सापडली जात आहे. त्यातच आता विक्रोळीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. विक्रोळीत पोलिसांनी व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला एका कॅश व्हॅनमध्ये साडे सहा टन (६५०० किलो) चांदीच्या विटा सापडल्या आहेत.

या चांदीच्या विटांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. या चांदीच्या विटा मुलुंडमधील एका गोदामामध्ये ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून ठेवण्यासाठी चाल्या होत्या. या विटा अधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स, पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांना करोडो रूपयांची माया सापडली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा मुंबई-पुणे महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर पोलिसांना एका कारमधून पाच कोटींची रक्कम मिळाली होती. कारमधील शहाजी नलावडे हे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे सहकारी असल्याची चर्चा होती. 

मुंबईत याआधीही भुलेश्वरमध्ये देखील १ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं होतं. त्याचबरोबर पुण्यात देखील दोन ठिकाणी पोलिसांनी मोठं घबाड जप्त केलं होतं. पुण्यात रोकड नेण्यासाठी आरोपींकडून कारचा वापर करण्यात आला होता.

मुंबई नाशिक महामार्गावर सापडले २ कोटी -

आज नाकाबंदीदरम्यान नाशिकहून मुंबईकडे जाणारी  (एम. एच. ११. बी. व्ही. ९७०८)  या  गाडीत २ कोटी रुपयांची रक्कम आढळून आली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चिंतामण पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी या कारमध्ये रोख रक्कम आढळून आली आहे. या गाडीत अंदाजे २ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम पोलिसांनी जप्त केली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर