उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच विषय संपवला, म्हणाले..
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच विषय संपवला, म्हणाले..

उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच विषय संपवला, म्हणाले..

Oct 21, 2024 05:50 PM IST

Maharashtra Assembly Election : आमचे सरकार पाडले. आमचे चिन्ह चोरले आणि त्यापेक्षा हा महाराष्ट्र गद्दारांच्या हाती दिला. ही वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला. जर कुणी अशी शंका घेत असेल तर ते एका बापाच्या औलादी नाहीत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी केला संजय राऊत अमित शहा भेटीवर दिली आहे.

संजय राऊत
संजय राऊत

Maharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याच्या वृत्ताची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे भाजपा पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेने महाराष्ट्रात खळबळ उडालीआहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांची भाजपसोबत जवळीक वाढली आहे,संजय राऊत आणि अमित शाह यांच्यामध्ये दिल्लीत भेट झाली. त्याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचीही गुप्तभेट झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'शिवसेना स्वाभिमानाशी तडजोड करणार नसल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. अमित शहा यांची भेट घेतली का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, हा प्रश्न हास्यास्पद आहे. जर काँग्रेस नेत्यांचा दावा असेल तर आम्हाला आश्चर्य वाटतं. या शक्तींशी सगळ्यात जास्त कुणी संघर्ष केला असेल तर तो शिवसेनेने केला आहे. केवळ संघर्ष केला नाही तर आमच्यासारख्या लोकांना तुरुंगात टाकलं. आमचा पक्ष फोडला. आमचे सरकार पाडले. आमचे चिन्ह चोरले आणि त्यापेक्षा हा महाराष्ट्र गद्दारांच्या हाती दिला. ही वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला. हा संघर्ष अशा टोकाला आला आहे जर कुणी अशी शंका घेत असेल तर ते एका बापाच्या औलादी नाहीत. मग ते कोणत्याही पक्षाचे असो, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना भाजप घाबरली आहे. आम्ही जो संघर्ष केलाय तो त्यांच्यासोबत जायला केलाय का? आमची लढाई महाराष्ट्राच्या शत्रूशी, ज्यांनी हा महाराष्ट्र लुटला त्यांच्यासोबत आहे. लुटारू टोळीच्या सरदारासोबत आमचं नाव जोडून भाजपने त्यांच्या मनातील भीती दाखवली आहे. हे षडयंत्र आहे. जे देशाचे संविधान संपवू इच्छितात. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळताहेत, शिवसेना कधीही अशा लोकांसोबत जाणार नाही, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

आम्ही मोठा संघर्ष केला आहे, त्यांनी आमचा पक्ष फोडला,चिन्ह चोरलं. आमच्यावर संशय घेणारे एका बापाची औलाद नाहीत. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. त्यांनी बाप दाखवावा नाहीतर श्राद्ध घालावं. स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानवर शिंतोडे उडवणारे हे लोक आहेत.

आमच्याकडे वेगळं पेगासिस आहे. कोणीही पसरवल्या असतील. बातम्या दिल्या असतील. आमचीही यंत्रणा आहे. ही बातमी कोणी दिली, याची माहीती आमच्याकडे आली आहे. शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. त्यांच्याशी हात मिळवणे म्हणजे औरंगजेबशी हात मिळवणे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर