Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी २ आमदारांना कोट्यवधींची ऑफर, काँग्रेसचा आरोप
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी २ आमदारांना कोट्यवधींची ऑफर, काँग्रेसचा आरोप

Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी २ आमदारांना कोट्यवधींची ऑफर, काँग्रेसचा आरोप

Updated Oct 26, 2024 04:56 PM IST

Maharashtra Assembly Election 2024: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी दोन आमदारांना कोट्यवधी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी २ आमदारांना कोट्यवधींची ऑफर?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी २ आमदारांना कोट्यवधींची ऑफर? (PTI)

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. दोन आमदारांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना चेन्नीथला यांनी हे आरोप केले.

‘अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी दोन आमदारांना कोट्यवधी रुपयांची ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसे करणे हे पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत येते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता गप्प का आहेत? जे घडले ते लोकांना सांगण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. लाच देणे आणि घेणे हे गुन्हेगारी कृत्य आहे. या प्रकरणी कारवाई व्हायला हवी’, अशीही त्यांनी मागणी केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही आठवडे शिल्लक असताना काँग्रेस नेत्याने असे आरोप केले आहेत. तत्पूर्वी सर्वच राजकीय पक्ष प्रसारात गुंतले आहेत. हळूहळू उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शनिवारी आपल्या २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखालील पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने या उमेदवारांची नावे निवडली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली दुसरी यादी जाहीर केली. या यादीत एकूण २३ उमेदवारांचा समावेश आहे. याआधी काँग्रेसने पहिल्या यादीत ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज दुपारी यादी जाहीर केली.

काँग्रेसची दुसरी यादीतील उमेदवारांची नावे

१. भुसावळ- राजेश मानवतकर

२. जळगाव, जामोद- स्वाती विटेकर

३. वर्धा- शेखर शेंडे

४. सावनेर- अनुजा केदार

५. नागपूर दक्षिण- गिरीश पांडव

६. कामठी- सुरेश भोयर

७. भंडारा- पूजा ठावकर

८. अर्जुनी मोरगांव- दिलीप बनसोड

९. आमगाव- राजकुमार पुरम

१०. राळेगाव- वसंत पुरके

११. यवतमाळ- अनिल मंगुलकर

१२. अरणी- जितेंद्र मोघे

१३. उमरखेड- साहेबराव कांबळे

१४. जालना- कैलास गोरंट्याल

१५. छत्रपती संभाजीनगर पूर्व- मधुकर देशमुख

१६. वसई- विजय पाटील

१७. कांदिवली पूर्व- काळू पडलिया

१८. चारकोप- यशवंत सी.

१९ सायन- गणेश यादव

२०. श्रीरामपूर- हेमंत ओघळे

२१. निलंगा- अभयकुमार साळुंखे

२२. शिरोळ- गणपतराव पाटील

२३. अकोट – महेश गणगणे

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर