Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण २२ उमेदवारांची नावे आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. तसेच तिसरी यादी पत्रकार परिषद न घेता लवकरच जाहीर केली जाईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना आपल्या पक्षातील २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले की, 'आम्ही आतापर्यंत एकूण ६७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मला विश्वास आहे की, या सर्व जागा आम्ही जिंकू.' महाविकास आघाडीमधील जागावाटपाबाबत ते म्हणाले की, ‘आता कोणत्याही बैठका होणार नाहीत. फोनवर घटक पक्षातील नेत्यांशी चर्चा होत आहेत. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष जवळपास ९० जागा लढवत आहेत. एखाद्या पक्षाला २-३ जागा कमी किंवा जास्त मिळू शकतात’, असेही जयंत पाटलांनी म्हटले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी
१) एरंडोल – सतीश अण्णा पाटील
२) गंगापूर – सतीश चव्हाण
३) शहापूर – पांडुरंग बरोरा
४) भूम-परांडा – राहुल मोटे
५) बीड – संदीप क्षीरसागर
६) आर्वी – मयुरा काळे
७) बागलान – दीपिका चव्हाण
८) येवला – माणिकराव शिंदे
९) सिन्नर – उदय सांगळे
१०) दिंडोरी – सुनीताताई चारोसकर
११) नाशिक पूर्व – गणेश गिते
१२) उल्हासनगर – ओमी कलानी
१३) जुन्नर – सत्यशील शेरकर
१४) पिंपरी – सुलक्षणा शिलवंत
१५) खडकवासला – सचिन दोडके
१६) पर्वती – अश्विनीताई कदम
१७) अकोले – अमित भांगरे
१८) अहिल्यानगर शहर – अभिषेक कळमकर
१९) माळशिरस – उत्तम जानकर
२०) फलटण – दीपक चव्हाण
२१) चंदगड – नंदिनीताई कुपेकर
२२) इचलकरंजी – मदन कारंडे
संबंधित बातम्या