Ruturaj Patil: पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांची वाढ, काँग्रेस नेते ऋतुराज पाटील यांची एकूण संपत्ती किती? वाचा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ruturaj Patil: पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांची वाढ, काँग्रेस नेते ऋतुराज पाटील यांची एकूण संपत्ती किती? वाचा

Ruturaj Patil: पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांची वाढ, काँग्रेस नेते ऋतुराज पाटील यांची एकूण संपत्ती किती? वाचा

Published Oct 25, 2024 05:56 PM IST

Ruturaj Patil Property News: काँग्रेस नेते ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना आपली संपत्ती जाहीर केली.

ऋतुराज पाटील यांची एकूण संपत्ती किती? वाचा
ऋतुराज पाटील यांची एकूण संपत्ती किती? वाचा

Ruturaj Patil Property News In Marathi: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. राज्यातील सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. दरम्यान काँग्रेस नेते ऋतुराज पाटील यांना कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. ऋतुराज पाटील यांनी साधेपणाने गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना ऋतुराज पाटील यांनी आपली संपत्ती जाहीर केली.

ऋतुराज पाटील यांच्या संपत्तीत एकूण १४ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. ऋतुराज पाटील यांची एकूण संपत्ती ४८ कोटी ४८ लाख ७८ हजार रुपये इतकी आहे, यात जंगम मालमत्ता २५ कोटी १८ लाख ५३ हजार ८ रुपये इतकी आहे. तर, २३ कोटी ३० लाख २५ हजार २४२ रुपये स्थावर मालमत्ता आहे.त्यांच्यावर एकूण २६ कोटी ९८ लाख १४ हजार ६८६ रुपयांचे कर्ज आहे. तर, ऋतुराज पाटील यांच्याकडे ४ कोटी ४२ लाख १० हजार ५२५ रुपये वारसा संपत्ती आहे.

कुटुंबातील सदस्यांच्या नावावर किती संपत्ती?

ऋतुराज पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांच्या नावावर जंगम आणि स्थावर मालमत्ता अनुक्रमे ६७ लाख ६२ हजार ७०६ रुपये आणि २ कोटी २४ लाख ६७ हजार इतकी आहे. त्यांचा मुलगा अर्जुन पाटीलच्या नावावर १ कोटी ५१ लाख ९७ हजार ५८२ रुपये जंगम मालमत्ता आहे आणि २ कोटी ६१ लाख ५८ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांचा दुसऱ्या मुलाच्या नावावर १ कोटी ३२ लाख ६५ हजार ६२४ रुपयांची जंगम तर, ९२ लाख ६८ हजार ८०० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

काँग्रेसच्या ४८ उमेदवारांची पहिली यादी

१) अक्कलकुवा (एसटी) - अॅड. के. सी. पाडवी

२) शहादा (एसटी) - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित

३) नंदूरबार (एसटी) - किरण दामोदर तडवी

४) नवापूर (एसटी) - श्रीकृष्णकुमार सुरुपसिंह नाईक

५) साकरी (एसटी) - प्रवीण बापू चौरे

६) धुळे ग्रामीण - कुणाल रोहिदास पाटील

७) रावेर - अॅड. धनंजय शिरिष चौधरी

८) मलकापूर - राजेश पंडितराव एकडे

९) चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे

१०) रिसोड - अमित सुभाषराव झनक

११) धामणगाव रेल्वे - प्रो. विरेंद्र वाल्मिकराव जगताप

१२) अमरावती - डॉ. सुनिल देशमुख

१३) तिवसा - अॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर

१४)अचलपूर - अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख

१५) देवळी - रणजीत प्रताप कांबळे

१६)नागपूर दक्षिण पश्चिम - प्रफुल विनोदराव गुडधे

१७)नागपूर मध्य - बंटी बाबा शेळके

१८) नागपूर पश्चिम - विकास पी. ठाकरे

१९) नागपूर उत्तर (एससी) - डॉ. नितीन काशिनाथ राऊत

२०) साकोली - नानाभाऊ फाल्गुनराव पटोले

२१) गोंदिया - गोपालदास शंकरलाल अग्रवाल

२२) राजुरा - सुभाष रामचंद्रराव धोटे

२३) ब्रह्मपुरी - विजय नामदेवराव वडेट्टीवार

२४) चिमुर - सतीश मनोहरराव वारजूकर

२५) हदगाव - माधवराव निवृत्तीराव पवार पाटील

२६) भोकर - तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर

२७) नायगाव - मिनल निरंजन पाटील (खतगावकर)

२८) पाथरी - सुरेश अंबादास वरपुडकर

२९) फुलंब्री - विलास केशवराव औताडे

३०) मीरा भायंदर - सय्यद मुझफ्फर हुसैन

३१) मालाड पश्चिम - अस्लम आर. शेख

३२) चांदीवली - मोहम्मद आरिफ नसीम खान

३३) धारावी (एससी) - डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड

३४) मुंबादेवी - अमिन अमिराली पटेल

३५) पुरंदर - संजय चंद्रकांत जगताप

३६) भोर - संग्राम अनंतराव थोपटे

३७) कसबा पेठ - रविंद्र हेमराज धंगेकर

३८) संगमनेर - विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

३९) शिर्डी - श्रीमती. प्रभावती जे. घोगरे

४०) लातूर ग्रामीण - धिरज विलासराव देशमुख

४१) लातूर शहर - अमित विलासराव देशमुख

४२) अक्कलकोट - सिद्धराम सतलिंगप्पा म्हेत्रे

४३) कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण

४४) कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज संजय पाटील

४५) करवीर - राहुल पांडुरंग पाटील

४६) हातकणंगले (एससी) - राजू जयंतराव आवळे

४७) पलूस काडेगाव - डॉ. विश्वजीत पतंगराव कदम

४८) जत - विक्रमसिंह बाळासाहेब सावंत

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर