Ramdas Athawale: ...वाजवूया महाविकास आघाडीचे बारा, मोदींच्या सभेत रामदास आठवलेंची भन्नाट कविता
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ramdas Athawale: ...वाजवूया महाविकास आघाडीचे बारा, मोदींच्या सभेत रामदास आठवलेंची भन्नाट कविता

Ramdas Athawale: ...वाजवूया महाविकास आघाडीचे बारा, मोदींच्या सभेत रामदास आठवलेंची भन्नाट कविता

Nov 08, 2024 04:45 PM IST

Maharashtra Assembly Election 2024: नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भन्नाट कविता केली.

मोदींच्या सभेत रामदास आठवलेंची भन्नाट कविता
मोदींच्या सभेत रामदास आठवलेंची भन्नाट कविता

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली. या सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कवितेतून महाविकास आघाडीवर टीका केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत आहे. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. नुकतीच त्यांची नाशिक येथे सभा पार पडली. या सभेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मात्र, रामदास आठवले यांनी केलेल्या कवितेची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. राम आठवले यांनी आपल्या कवितेतून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

रामदास आठवले यांची कविता

वाढवायची आहे आपल्याला महाराष्ट्राची शान...,

साऱ्या देशाचे आहे नरेंद्र मोदींकडे ध्यान...,

महाराष्ट्र सुटलाय महायुतीचा वारा...,

नरेंद्र मोदींसाठी जमलाय जनसमुदाय सारा...,

देऊया भारत मातेचा नारा आणि वाजवूया मविआचे बारा

...तर आम्ही कांग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही

नाशिक येथे पार पडलेल्या सभेत रामदास आठवले यानी संविधान वाचवण्यासाठी महायुतीला मतदान करा, असे जनतेला आवाहन केले. आरक्षण संपवले तर, आम्ही कांग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला.

मोदींची काँग्रेसवर टीका

काँग्रेस आता अखिल भारतीय काँग्रेस राहिलेली नाही. ती आता परोपजीवी काँग्रेस बनली आहे. हा काँग्रेस पक्ष आता केवळ क्रॅचवर जगत आहे,' असे मोदी यांनी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना सांगितले. महाराष्ट्र असो, उत्तर प्रदेश असो, बिहार असो किंवा झारखंड, बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेस इतर पक्षांच्या पाठिंब्यावरच निवडणूक लढवण्याच्या स्थितीत आहे, असे मोदी म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी सर्व २८८ जागांसाठी मतमोजणी होणार आहे. राज्यात महायुती ( भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) यांच्यात मुख्य लढत आहे. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. तर, २०२४ मध्ये भाजपला १२२, शिवसेनेला ६३ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर