Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात रामदास आठवडे यांच्यासारखा मंत्री होण्यापेक्षा माझा पक्ष बंद करेल, असे म्हटले होते. यावर रामदार आठवले यांनी मी आता मंत्री झालो असून राज ठाकरेंनी आपला पक्ष बंद करावा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.'महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत असली तरी ही निवडणूक महायुतीसाठी अत्यंत सोपी आहे. लोकसभेत खोट्या नरेटीव्हमुळे महायुतीला नुकसान सहन करावे लागले. परंतु, विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० पर्यंत जागा मिळतील', असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीला दणक्यात सुरुवात केली. महायुतीच्याविरोधातही राज यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी रामदास आठवलेसारखे मंत्री व्हायचे असेल तर मी पक्ष बंद करेन, असा टोला लगावला. यावर रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
रामदास आठवले म्हणाले की, 'राज ठाकरे एका पक्षाचे नेते आहेत, मी त्यांच्या विरोधात कधी बोलत नाही. माझ्यासारखा माणूस त्यांच्या पक्षात जाणार नाही. मी पँथर काळापासून संघर्ष केला, त्यामुळं मला मंत्रिपद मिळाले. राज ठाकरेंना बोलू द्या. माझा पक्ष गरिबांचा पक्ष आहे, आता मी मंत्री झालो आहे तर, राज ठाकरे यांनी त्यांचा पक्ष बंद करावा.'
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला नुकसान सहन करावे लागले, पण विधानसभेत महायुती सर्वाधिक जागा जिंकेल असा विश्वास रामदार आठवले यांनी व्यक्त केला. रामदास आठवले म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० जागा मिळतील. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआयला एकच जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. पण मी ती दूर केली आहे. विधानसभेत आम्हाला एक जागा मिळाली असली तरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला एक विधानपरिषद आणि सत्ता आल्यावर मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले आहे.
अरविंद सावंत हे चांगले नेते आहेत. त्यांनी शायना एनसी यांना म्हणणे गंभीर बाब आहे. अरविंद सावंत यांनी केलेले वक्तव्य म्हणजे सगळ्या महिलांचा अपमान आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.