Amit Thackeray: स्टेट बँकेच्या दादर शाखेत अमित ठाकरे यांची तब्बल १०७ खाती, एकूण संपत्ती किती? वाचा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amit Thackeray: स्टेट बँकेच्या दादर शाखेत अमित ठाकरे यांची तब्बल १०७ खाती, एकूण संपत्ती किती? वाचा

Amit Thackeray: स्टेट बँकेच्या दादर शाखेत अमित ठाकरे यांची तब्बल १०७ खाती, एकूण संपत्ती किती? वाचा

Oct 29, 2024 04:39 PM IST

Amit Thackeray Property News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना आपली संपत्ती जाहीर केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: अमित ठाकरेंची संपत्ती किती? वाचा
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: अमित ठाकरेंची संपत्ती किती? वाचा

Amit Thackeray Property News In Marathi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून अमित यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला आहे. त्यानुसार, त्यांच्या नावावर एकूण १२ कोटींहून अधिक संपत्ती आहे. त्यांच्या नावे दादरच्या स्टेट बँकेच्या शाखेत तब्बल १०७ अकाऊंटस आहेत.

अमित ठाकरे यांच्या नावावर १२ कोटी ५४ लाख रुपयांची एकूण जंगम मालमत्ता आहे. तर, १ कोटी २९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर ४ कोटी १९ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याजवळ १ लाख ८ हजार रुपयांची रोकड आहे. अमित ठाकरे यांच्या बँकेच्या खात्यात ४० लाख ९९ हजार ७६३ रुपये आणि पोस्ट खात्यात २० लाख रुपये इतकी रक्कम आहे. त्यांच्या नावावर ६ कोटी २९ रुपयांच्या ठेवी आहेत. तर, त्यांच्याकडे ३ कोटी ९८ लाख रुपयांचे शेअर्स आहेत. अमित ठाकरे यांच्याकडे ३ तोळे सोने आहे. त्यांचा ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह असा व्यवसाय आहे.

अमित ठाकरेंच्या पत्नीच्या नावावर संपत्ती किती?

अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांच्या नावे १ कोटी ७२ लाख रुपयांची संपत्ती आहे. तर, ५८ लाख ३८ हजार ५८७ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. मिताली ठाकरे यांच्याकडे ९ तोळे सोने आहे. मिताली ठाकरे यांच्या नावावर ५ कोटी ९३ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांनी म्युचूअल फंडमध्ये ५२ लाख रुपयांची गुंतवणूक केली.सह्याद्री फिल्ममध्ये ५० टक्के शेअर्स आहेत. मिताली यांची तथास्तु बिल्डर्समध्ये २० टक्के भागिदारी आहे. त्यांचादेखील ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्हचा व्यवसाय आहे. त्यांच्या मुलाच्या नावावर ७० हजार रुपये आहेत. तसेच मुलाच्या नावाच्या म्युच्यूअल फंडमध्ये ६० लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.

अर्ज भरण्याआधी घेतले बाप्पाचे दर्शन

अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील बाप्पांचे दर्शन घेतते. यानंतर त्यांनी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला जाऊन अभिवादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांना देखील अभिवादन केले. पुढे अमित ठाकरेंनी आपल्या पत्नीसह मुंबईतील सिद्धविनायक मंदीरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. अमित ठाकरे उमेदवारी दाखल करताना मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी गर्दी केली होती. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर