आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने आज पाचवी उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत १६ उमेदवारांचा समावेश आहे. पाचव्या यादीत वंचित बहुजन आघाडीने विविध समाजघटकांतील उमेदवारांना संधी दिली आहे. या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बारामती मतदारसंघात देखील उमेदवार देण्यात आला आहे. बारामतीतून मंगलदास निकाळजे यांना उमेदवारी दिली आहे.
1) भुसावळ मतदारसंघ –जगन देवराम सोनवणे
2) मेहकर मतदारसंघ - डॉ. ऋतुजा चव्हाण
3) मूर्तीजापूर मतदारसंघ - सुगत वाघमारे
4) रिसोड मतदारसंघ –प्रशांत सुधीर गोळे
5) ओवळा माजिवडा मतदारसंघ–लोभसिंग राठोड
6) ऐरोली मतदारसंघ –विक्रांत चिकणे
7) जोगेश्वरीपूर्वमतदारसंघ –परमेश्वर रणशुर
8) दिंडोशी मतदारसंघ-राजेंद्र ससाणे
9) मालाड मतदारसंघ –अजय रोकडे
10) अंधेरीपूर्व विधानसभा मतदारसंघ –ॲड. संजीव कुमार कलकोरी
11) घाटकोपर पश्चिम मतदारसंघ –सागर गवई
12) घाटकोपर पूर्व मतदारसंघ - सुनीता गायकवाड
13) चेंबूर मतदारसंघ -आनंद जाधव
14) बारामती मतदारसंघ -मंगलदास निकाळजे
15) श्रीगोंदा मतदारसंघ - अण्णासाहेब शेलार
16) उदगीर मतदारसंघ -डॉ. शिवाजीराव देवनाळे
विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीच वंचित आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये ११ उमेदवारांना संधी देण्यात आली होती. त्यामध्ये, वंचितकडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यात आलं आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. शमिभा या तृतीयपंथीय (transgender) असून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर १० मुस्लीम उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. वंचितने विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली असून आतापर्यंत पाच उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत.
संबंधित बातम्या