महाविकास आघाडी व महायुतीत जागावाटपावरून काथ्याकूट सुरू असताना वंचितने विधानसभा निवडणुकांच्या तयारीत आघाडी घेतली असून आज १० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या सर्व जागांवर मुस्लीम उमेदवारांना संधी दिली आहे. येत्या आठवडाभरात महाराष्ट्रात निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यात मनसेनंतर वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली असून वंचितने आज १० विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली.
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी तिसऱ्या आघाडीत सामील होणार का? अशी चर्चा होत असतानाच वंचितने आज १० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करत स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीने १० जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. यात औरंगाबाद मध्य (छत्रपती संभाजीनगर मध्य), कल्याण पश्चिम, परभणी, हडपसर, माण, सांगली, गंगापूर, शिरोळ, मलकापूर, बाळापूर व परभणी या महत्त्वाच्या मतदारसंघाचाही समावेश आहे.
1. शहेजाद खान सलीम खान (मलकापुर विधानसभा)
2. खतीब सैय्यद नातीकोद्दीन (बाळापूर विधानसभा)
3. सय्यद समी सय्यद साहेबजान (परभणी विधानसभा)
4. जावेद मो. इसाक (औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ)
5. सय्यद गुलाम नबी सय्यद गफुर (गंगापूर विधानसभा)
6. अयाज गुलजार मोलवी (कल्याण पश्चिम )
7. मोहम्मद अफरोज मुल्ला (हडपसर विधानसभा)
8. इम्तियाज जाफर नदाफ (माण विधानसभा)
9. आरिफ मोहम्मद अली पटेल (शिरोळ विधानसभा)
10. आल्लाउद्दीन हयातचाँद काजी(सांगली विधानसभा)
वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच वंचितने आपले २१ उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत वंचितने ११ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
शमिभा पाटील (रावेर मतदारसंघ), सविता मुंडे (सिंधखेड राजा), मेघा डोंगरे (वाशीम),
निलेश विश्वकर्मा (धामणगाव रेल्वे), विनय भांगे (नागपूर दक्षिण-पश्चिम) डॉ. आविनाश नन्हे (साकोली), फारुख अहमद (दक्षिण नांदेड),शिवा नरांगळे (लोहा), विकास रावसाहेब दांडगे (संभाजीनगर), किसन चव्हाण (शेवगाव), संग्राम माने (खानापूर)
संबंधित बातम्या