शरद पवारांनी जातीयवाद केल्याचा पुरावा मागितला, राज ठाकरेंनी सांगितला पुण्यातील 'तो' प्रसंग!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शरद पवारांनी जातीयवाद केल्याचा पुरावा मागितला, राज ठाकरेंनी सांगितला पुण्यातील 'तो' प्रसंग!

शरद पवारांनी जातीयवाद केल्याचा पुरावा मागितला, राज ठाकरेंनी सांगितला पुण्यातील 'तो' प्रसंग!

Nov 11, 2024 08:40 PM IST

Raj Thackeray on Sharad Pawar: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.

शरद पवारांनी जातीयवाद केल्याचा पुरावा मागितला, राज ठाकरेंनी सांगितला पुण्यातील 'तो' प्रसंग!
शरद पवारांनी जातीयवाद केल्याचा पुरावा मागितला, राज ठाकरेंनी सांगितला पुण्यातील 'तो' प्रसंग! (Hindustan Times)

Raj Thackeray News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी एका सभेत शरद पवार हे महाराष्ट्रातील जातीयवादाचे जनक असल्याचे त्यांनी म्हटले. यावर बोलताना शरद पवार यांनी मी जातीयवाद केल्याचे एक पुरावा राज ठाकरे द्यावा, असे आव्हान दिले. या आव्हानाला आता राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. याचदरम्यान, राज ठाकरेंना शरद पवारांच्या आव्हानाबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी शरद पवार यांचा पुण्यातील एक प्रसंग सांगितला आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

'शरद पवारांच्या जातीयवादाचे अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी एक सांगतो. पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवारांना लोकमान्य टिळकांची पुणेरी पगडी घालण्यात आली. मात्र, त्यांनी ती काढली आणि ज्योतिबा फुले यांची पगडी घातली. खरे तर ती पगडी घालण्याला माझा विरोध नाही. पुणेरी पगडी न वापरता फुलेंची पगडी घालत जा,असे म्हणणे याला माझा विरोध आहे. हा एकप्रकारे जातीयवाद आहे' असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंना आयुष्यात काहीही केले नाही, अशी टीका शरद पवारांनी केली होती. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'शरद पवार यांना वयानुसार काही गोष्टी आठवत नसतील. मी केलेल्या अनेक गोष्टींचे पुस्तक त्यांना पाठवतो. त्यानंतर त्यांना कळेल की, ते कोणत्या गोष्टी विसरले आहेत.'

 

राज्यात २० नोव्हेंबरला मतदान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबररोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाडींमधील राजकीय लढाई तीव्र होत चालली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश आले. मात्र विधानसभा निवडणुकीत जनतो कोणाच्या बाजूने कौल देणार आहे. येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर