राज ठाकरेंचा धडाका..! मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; अनेक ठिकाणी महायुतीविरोधात दिले उमेदवार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज ठाकरेंचा धडाका..! मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; अनेक ठिकाणी महायुतीविरोधात दिले उमेदवार

राज ठाकरेंचा धडाका..! मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; अनेक ठिकाणी महायुतीविरोधात दिले उमेदवार

Updated Oct 23, 2024 09:23 PM IST

MNS Third Candidate List : राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये १३ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर

Maharashtra assembly election 2024 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी ४५ उमेदवारांची दुसरी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत मनसेनं १३ जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पालघर अन् ठाण्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

या यादीत ठाणे, पालघर, नाशिकमधील काही जागांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिकमध्ये मनसेने भाजपला धक्का देत आपला उमेदवार दिला आहे. परळीमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात अभिजित देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.

मनसेची तिसरी उमेदवार यादी -

  • कुर्ला - प्रदीप वाघमारे
  • अमरावती - मंगेश पाटील
  • नाशिक पश्चिम- दिनकर धर्माजी पाटील
  • अहमदपूर चाकूर - नरसिंग भिकाणे
  • परळी - अभिजीत देशमुख
  • विक्रमगड - सचिन शिंगडा
  • भिवंडी ग्रामीण - वनिता शशिकांत कथुरे
  • पालघर - नरेश कोरडा
  • शहादा - आत्माराम प्रधान
  • वडाळा - स्नेहल सुधीर जाधव
  • ओवळा माजिवडा - संदीप पाचंगे
  • गोंदिया - सुरेश चौधरी
  • पुसद - अश्विन जयस्वाल

लोकसभा निवडणुकी वेळीच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश दिले होते. त्यानंतर काही दिवसापूर्वी त्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्या प्रमाणं मनसेनं पहिल्यांदा ७ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी मनसेकडन ४५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्यानंतर आज आणखी १३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. आतापर्यंत मनसेने ६५ उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

प्रताप सरनाईकांविरोधात उमेदवार

नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपकडून सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याला दिनकर पाटील यांचा विरोधा होता. त्यांनी आजच राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला अन् सायंकाळी जाहीर करण्यात आलेल्या तिसऱ्या यादीत त्यांना स्थान दिले गेले. याशिवाय राज ठाकरे यांनी शिवसेनेचे ओवळा माजीवाडाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात देखील उमेदवार देण्यात आला आहे. संदीप पाचंगे हे प्रताप सरनाईक यांच्या विरोधात लढणार आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या