Maharashtra Assembly Election : एमआयएम विधानसभेच्या रिंगणात; ओवैसींनी इम्तियाज जलील यांच्यासह ५ उमेदवार केले जाहीर-maharashtra assembly election 2024 mim asaduddin owaisi announced five candidates ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Assembly Election : एमआयएम विधानसभेच्या रिंगणात; ओवैसींनी इम्तियाज जलील यांच्यासह ५ उमेदवार केले जाहीर

Maharashtra Assembly Election : एमआयएम विधानसभेच्या रिंगणात; ओवैसींनी इम्तियाज जलील यांच्यासह ५ उमेदवार केले जाहीर

Sep 09, 2024 07:09 PM IST

assemblyelection2024 : छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीमहाराष्ट्र विधानसभेसाठी एमआयमचे ५ उमेदवारआजजाहीर केले आहेत. लोकसभेला पराभूत झालेल्या इम्तियाज जलील यांना संभाजीनगरातून विधानसभेची तिकीट देण्याची घोषणा केली आहे.

एमआयएमकडून विधानसभा निवडणुकीसाठी ५ उमेदवारांची घोषणा
एमआयएमकडून विधानसभा निवडणुकीसाठी ५ उमेदवारांची घोषणा

Maharashtra Assembly Election : दसऱ्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मोठ्या नेत्यांनी राज्यव्यापी दौरे सुरू केले आहे. दरम्यानऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठी एमआयमचे ५ उमेदवार आज जाहीर केले आहेत.

माजी खासदार इम्तियाज जलील यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच सोलापूर विधानसभा मतदारसंघातून फारुख शब्दी, मालेगाव येथून मुफ्ती इस्माईल, धुळे येथून फारुख शहा आणि मुंबईत फैयाज अहमद खान यांच्या नावाची घोषणा ओवैसी यांनी केली आहे. अन्य उमेदवारांची यादी नंतर जाहीर केली जाणार असल्याचे ओवैसी यांनी सांगितलं आहे.

राज्यातील विधानसभेच्या तयारीसाठी एमआयएमकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मराठवाड्यातील संभाव्य उमेदवारांच्या याद्या सुरु केल्या होत्या. दरम्यान, एमआयएमने महाविकास आघाडीला सामील होण्यासाठी प्रस्ताव देत सप्टेंबर मध्यापर्यंत निर्णय न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशाराही देण्यात आला होता.

संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ओवेसींनी आगांनी विधानसभा निवडणूकीसाठी ५ उमेदवारांची घोषणा करत पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. ओवैसी म्हणाले की, गेल्या १० वर्षात भाजपने जे नियम बनवले त्याचे नुकसान मुस्लिम समाजाला सोसावे लागत आहे. तीन तलाक कायद्याने पती तुरुंगात गेला. जेलमध्ये राहून तो पत्नीला कसे पैसे देणार. हा कायदा केवळ मुस्लिमांना त्रास देण्यासाठी आणला. मोदी आणि शहांनी इतकी घाण करून ठेवली आहे की, पाच वर्षापासून मुस्लिम, ख्रिश्चन आणि आदिवासी सडत आहेत. ओवैसी म्हणाले की,  सप्टेंबरमध्ये जनगणनेचे काम सुरू होईल. मला भीती वाटते की, यावेळी एनपीए, एनआरसीचे काम सुरू होऊन आपल्याकडे पुरावे मागितले जाणार. तुमचे पूर्वज कुठ जन्मले असे विचारले जाणार.

यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी वक्फ बोर्डाचा मुद्दाही उपस्थित करत म्हटले की, वक्फच्या जागा या सरकारी नाही, खाजगी जागा आहेत. मोदी सरकार या जमिनी हिसकावून घेण्यासाठी हे विधेयक आणत आहेत. या बिल विरोधात क्यूआर कोड मार्फत विरोध दर्शवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Whats_app_banner