VIDEO : सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर; दारातूनच हाकलून लावलं! माहीमच्या कोळीवाड्यात नेमकं काय घडलं?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  VIDEO : सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर; दारातूनच हाकलून लावलं! माहीमच्या कोळीवाड्यात नेमकं काय घडलं?

VIDEO : सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर; दारातूनच हाकलून लावलं! माहीमच्या कोळीवाड्यात नेमकं काय घडलं?

Nov 11, 2024 07:45 PM IST

Mahim Assembly Constituency : माहीम कोळीवाड्यातशिवसेना नेतेसदा सरवणकर यांची प्रचार रॅली सुरू होती. त्यावेळी स्थानिक महिलांनी सरवणकरांच्या प्रचाराला विरोधकेला. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर
सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर

मुंबईतील ज्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे, ती हायव्होल्टेज लढत म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध मनसे आहे. कारण,या मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यादांच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांच्यावर महायुतीच्या नेत्यांकडून अर्ज माघारीचा दबाव होता, मात्र त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने मतदारसंघातील चुरस वाढली आहे.

सरवणकरांकडून निवडणूक प्रचार सुरू केला असून त्यांना माहिमच्या कोळीवाड्यात महिलांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यात संबंधित महिला चांगलीच संतापल्याचे दिसून येत आहे.

काय आहे प्रकार?

माहीम कोळीवाड्यात शिवसेना नेते सदा सरवणकर यांची प्रचार रॅली सुरू होती. त्यावेळी स्थानिक महिलांनी सरवणकरांच्या प्रचाराला विरोधकेला.आमदार सरवणकर यांनी स्थानिक महिलांचे फिश फूड स्टॉल हटवल्याचा आरोप महिलांनी केला आहे. प्रचारासाठी आलेल्या सदा सरवणकरांना संतप्त महिलांनी आम्ही फूड स्टॉल लावत होतो, तो का बंद करायला लावला हे आधी सांगा. कधी चालू करणार? असा जाब विचारला.

 

तेव्हा सरवणकरांनी लवकरच सुरू करू, घरात बसून यावर चर्चा करू असे म्हटले. मात्र महिला म्हणाली घरात नको, बाहेरच राहा. त्यानंतर कुठलेही उत्तरे न देता तिथून काढता पाय घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्थानिक कोळी महिलांची नाराजी सरवणकरांचा प्रचार करणाऱ्यांनाभोवली आहे.

या व्हिडिओमध्ये कोळी महिला खूपच संतापल्याच पाहायला मिळतंय. सदा सरवणकर हे तिचा संताप पाहिल्यावर काहीही न बोलता तिथून निघून गेल्याचंही दिसत आहेत. सदा सरवणकरांना माहीम कोळीवाड्यात अशाप्रकारे रोषाचा सामना करावा लागत आहेत, याचा त्यांना फटका बसणार का? अशाही चर्चा सुरु झाल्या आहेत.

 

दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांनी पुत्र अमित यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी, अमित यांच्या विरोधातील उमेदवारांना टीका करणार नसल्याचे म्हणत त्यांच्या इतिहासाची आठवण माहीमकरांना करुन दिली. काँग्रेसमधून हे शिवसेनेत आल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं. दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर यांच्यावर सध्या मनसेच्या नेत्यांकडून चौफेर टीका सुरू आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर