Maharashtra Politics: विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; विदर्भातील तिढा कायम, मोठा भाऊ कोण?-maharashtra assembly election 2024 maha vikas aghadi on 80 percent seat sharing formula is complete ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Politics: विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; विदर्भातील तिढा कायम, मोठा भाऊ कोण?

Maharashtra Politics: विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; विदर्भातील तिढा कायम, मोठा भाऊ कोण?

Sep 20, 2024 11:15 PM IST

mahavikasaghadi : २८८ जागांपैकी महाविकास आघाडीच्या बैठकीत १३०जागांवर एकमत झाले आहे. विदर्भ, मराठवाडा,मुंबई आणि कोकणातील काही जागांवर वादाची स्थिती आहे.

महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला
महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

Seat sharing formula in maharashtra : महाराष्ट्रातील राजकारणातूनमोठी बातमी समोर आली असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra assembly election 2024) महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाल्याचे वृत्त आहे. जवळपास १३० जागांवर एकमत झाले असून विदर्भातील जागा वगळता जवळपास ८० टक्के जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई, कोकण, पश्चिम  महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील जागांवर सविस्तर चर्चाझाली आहे. वाद असलेल्या जागांवर महाविकास आघाडीकडून (maha vikas aghadi ) एक एजन्सी नेमून ज्यांची जिथे जास्त ताकद आहे, त्या पक्षाला ती जागा देण्यात येणार आहे. जागावाटपात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास जागा त्याच पक्षाला मिळणार आहेत. मात्र काही जागांवर बदल केला जाणार असल्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीची जागावाटपा संदर्भातील मुंबईत संपन्न झाली. या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदि उपस्थित होते.

काय आहे जागांचा फॉर्म्युला -

विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीतील घटक पक्षांचे ठरलं असल्याचे सांगितलं जात आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटप जवळपास ६० टक्के पुर्ण झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ पैकी १००-१०० जागा काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट लढणार आहे. तर ८४ जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहेत. तर उर्वरित ४ जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या जाणार आहेत. काही जागांवर विशेषकरून विदर्भातील जांगावर अजूनही तिढा कायम आहे, मात्र लवकरच हा तिढा सोडवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

२८८ जागांपैकी महाविकास आघाडीच्या बैठकीत १३० जागांवर एकमत झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, मुंबई आणि कोकणातील काही जागांवर वादाची स्थिती आहे. काही जागांवर आघाडीतील दोन पक्ष दावा सांगत असल्याने या जागांवर निर्णय होऊ शकला नाही. दोन्ही पक्षात वाद असलेल्या जागांवर पुढील आठवड्यात बैठका घेऊन तोडगा काढला जाईल.

Whats_app_banner