Maharashtra Lok Poll Survey Result : जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ही प्रक्रिया संपताच महाराष्ट्रात निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीशी संबंधित ओपिनियन पोल आणि फोरकास्टर'लोक पोल' या संस्थेनं महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ताजं सर्वेक्षण केलं असून याचे आकडे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाविकास आघाडी सत्ताधारी महायुतीला पराभूत करू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
लोक पोलच्या ताज्या सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार, आगामी विधानसभा निवडणुकीतमहाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीला११५ ते १२८ जागा मिळू शकतात तसेच त्यांची मतांची टक्केवारी ३८ ते ४१ इतकी राहू शकते.तसेचविरोधात असलेल्या महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत म्हणजे १४१ ते १५४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या मतांची टक्केवारी ४१ ते ४४ टक्के राहण्याची शक्यता आहे.राज्यात अपक्ष व अन्य पक्षांना ५ ते१८ जागा आणि १५ ते १८ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात एकूण २८८विधानसभा जागा अजून कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी १४५ जागांचा आकडा पार करावा लागणार आहे.
सर्वेक्षणात अंदाज वर्तवण्यात आला आहे की, महायुतीला मुंबई,उत्तर महाराष्ट्र (Khandesh) आणि कोकणात चांगल्या जागा मिळू शकतात. सर्वेक्षणात समोर आले आहे की, राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष बनून समोर येऊ शकतो, मात्र त्यांना जोरदार प्रचार करावा लागणार आहे. सर्वेक्षणात म्हणले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढली असून फडणवीस यांची लोकप्रियता घटली आहे.
निवडणुकीशी संबंधित ओपिनियन पोल आणि भविष्यवाणी करणाऱ्या 'लोक पोल' ने महाराष्ट्राशी संबंधित ग्राउंड सर्वे जवळपास एक महिने केला आहे. त्याचा अहवाल सोमवारी (९ सप्टेंबर २०२४) रोजी प्रसिद्ध करण्यात आला. सर्वेक्षणात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जवळपास ५०० सॅम्पल जमा करण्यात आले. अशा प्रकार संपूर्ण सर्वेक्षणात एकूण दीड लाख सॅम्पल गोळा केले गेले.