विधानसभेच्या परीक्षेत महायुती मेरीटमध्ये तर महाविकास आघाडी नापास; कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? वाचा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विधानसभेच्या परीक्षेत महायुती मेरीटमध्ये तर महाविकास आघाडी नापास; कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? वाचा

विधानसभेच्या परीक्षेत महायुती मेरीटमध्ये तर महाविकास आघाडी नापास; कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? वाचा

Nov 24, 2024 12:04 PM IST

Maharashtra Assembly Election 2024 Final Results Party wise : राज्यात शनिवारी विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीने या निवडणुकीत बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, पाहुयात..

विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेत महायुती मेरीटमध्ये तर महाविकास आघाडी नापास; कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ? वाचा
विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेत महायुती मेरीटमध्ये तर महाविकास आघाडी नापास; कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ? वाचा

Maharashtra Assembly Election All Party wise seats BJP Shivsena Congress : राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. तर महायुतीने सर्व विरोधकांचा सुपडा साफ केला. या निकालांनी सर्वांनांच धक्का बसला आहे. एक्झिट पोल्सचे आकडे आणि प्रत्यक्ष निकाल यात मोठी तफावत असल्याने हे निकाल पचवणे महाविकास आघाडीला अवघडं झालं आहे. या निवडणुकीत सर्व राजकीय विश्लेषक, एक्जिट पोलचे अंदाज चुकले. महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. यात भाजपने १३२ जागांवर विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.

महाविकास आघाडीचे पानिपत

या निवडणुकीत लोकसभेसारखे निकाल लागतीत अशी आशा महाविकास आघाडीच्या नेत्यांना होती. मात्र, सर्वांचे अंदाज फोल ठरले आहे. महविकास आघाडीला ५० जागा मिळवतांना देखील नाकीनऊ आले आहेत. यात कॉँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा देखील पराभव झाला. त्या तुलनेत एकनाथ शिंदे शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांनी चांगली कामगिरी करत भाजपला मजबूत केलंन आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा दारुण पराभव झाला असून विरोधी पक्षनेते पद देखील विधान सभेत दिसणार नाही.

कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आले?

१ भारतीय जनता पार्टी – भाजपा १३२

२ शिवसेना ५७

३ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) ४१

४ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २०

५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १६

६ राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार १०

७ समाजवादी पक्ष – सपा २

८ जन सुराज्य शक्ती २

९ राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष १

१० राष्ट्रीय समाज पक्ष १

११ ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन १

१२ भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – सीपीआय(एम) १

१३ भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष १

१४ राजर्षी शाहू विकास आघाडी १

१५ अपक्ष २

 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर