Eknath Shinde On Uddhav Thackeray: या वर्षाच्या अखेरिस महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यभरात सध्या महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात ठिकठिकाणी सभा आणि मेळावे सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. या अनुषंगाने आज शिंदेंच्या युवासेनेचे नेते तथा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती दिपेश म्हात्रे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला. यार एकनाथ शिंदे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.
दिपेश म्हात्रे यांच्या पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी खासदार श्रीकांत यांचाा शिंदेंचा कार्ट असा उल्लेख केला. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, मला त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. मी कामामधून उत्तर देतो. त्यामुळे ते बिथरले आहेत. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना धडकी भरली अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे. त्यामुळे मी सांगतो बापाशी भिडा ना मुलाशी काय भिडताय? असे चॅलेंज एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे आगाऊ पैसे देण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महिला लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत मासिक मदत मिळण्यात विरोधी पक्ष अडथळे निर्माण करू शकतात आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. विरोधकांच्या संभाव्य पावलांचा अंदाज घेऊन महाराष्ट्र सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिष्करण योजनेअंतर्गत मासिक देयके देण्यास सुरुवात केली आहे.
या योजनेअंतर्गत अडीच लाखरुपयांपेक्षा कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या महिलांना दरमहा १५०० रुपये मदत म्हणून मिळतात. सध्या सुरू असलेल्या योजनांवर आचारसंहितेचा परिणाम होत नसला तरी शिंदे सरकार धोका पत्करत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी लाडकी बहिण योजनेचे कौतुक केल्याचा दाखला देत शिंदे म्हणाले की, या योजनेबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या विरोधकांच्या तोंडावर ही थप्पड आहे.
संबंधित बातम्या