Liquor shops to remain closed for 4 days in Mumbai: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मुंबईत आजपासून (१८ नोव्हेंबर २०२४) पुढील चार दिवस ड्राय डे असेल. भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) आदेशानुसार, राज्यातील निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई आणि इतर शहरांमध्ये मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा चार दिवसांचा ड्राय डे पूर्ण दिवसभरासाठी नसून मद्यविक्रेत्यांना ठराविक वेळेत दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, कोणत्या दिवशी किती वाजेपर्यंत दारुचे दुकाने उघडे राहतील? हे जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात २८८ विधानसभेच्या जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे मुंबईत आजपासून पुढील चार दिवस दारुचे दुकाने पूर्णवेळ उघडे नसतील. निवडणूक आयोगाने दारू बंदीसाठी तारखा जाहीर केल्या आहेत.
१८ नोव्हेंबर २०२४: संध्याकाळी ६ वाजल्यापासून दारू विक्रीवर बंदी असेल.
१९ नोव्हेंबर २०२४: संपूर्ण दिवस दारुचे दुकान बंद असतील.
२० नोव्हेंबर २०२४: संध्याकाळी ६ वाजल्यानंतर दारूचे दुकाने उघडतील.
२३ नोव्हेंबर २०२४: संध्याकाळी ६ वाजल्यानंतर दारूचे दुकाने उघडतील.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी सार्वजनिक जाहीर करण्यात आली. क्रमांक सार्वसु-१०२४/१२६ (२९) लेखअधिनियम, १८८९ (१८८९चा २६) च्या कलम २५ नुसार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३१/१/६८ जेयुडीएल तीन दिनांक ८ मे १९६८ अन्यये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने बुधवार दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सर्व विधानसभा मतदारसंघानिक सुट्टी करीत आहे, असे परिपत्रकच राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी सर्व २८८ जागांसाठी मतमोजणी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) यांच्यात मुख्य लढत आहे. २०२९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. तर, २०१४ मध्ये भाजपला १२२ जागा, शिवसेनेला ६३ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजुने कौल देणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.