Devendra Fadnavis News: राज्यात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी याच्यात मुख्य लढत आहे. याच पाश्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक राज्यात कान्याकोपऱ्यातठिकठिकाणी सभा घेत आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची आज नागपुरात सभा पार पडली. या सभेत त्यांनी राज्यातील महिलांना आगळावेगळा सल्ला दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर लाडकी बहीण योजना बंद होईल, यामुळे कुटुंबाने इकडे तिकडे मतदान केल्यास त्यांना २ दिवस जेवायला देऊ नका, असे ते म्हणाले आहेत.
पश्चिम नागपूर मतदारसंघातील भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. या सभेत लाडकी बहीण योजनेच्या मुद्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, तुमचे लाडके भाऊ जिंकून आले तर, लाडक्या बहिणींच्या हफ्यात वाढ केली जाईल. त्यांना दरमहा १५०० ऐवजी २१०० रुपये दिली जातील, असे अश्वासन फडणवीस यांनी दिले. राज्यात सावत्र भाऊ निवडून आले तर योजना बंद करतील.माझी लाडक्या बहिणीला विनंती आहे की, जर तुमच्या कुटुंबातील लोकांनी इकडे तिकडे मतदान केल्यास त्यांना दोन दिवस जेवायला देऊ नका, असेही ते म्हणाले.
१) लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार तसेच महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांना पोलीस दलात समावेश करणार
२) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १५ हजार रुपये देणार
३) प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देणार
४) वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये रुपये देणार
५) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार
६) २५ लाख रोजगार निर्मिती तसेच १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रुपये देणार
७) ४५ हजार गावांमध्ये पाणंद रस्ते बांधणार
८) अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला १५ हजार रुपये वेतन आणि सुरक्षा कवच पुरवणार
९) वीज बिलात ३० टक्के कपात करणार, सौर आणि अक्षय उर्जेवर भर देण्याचे वचन
१०) सरकार स्थापनेनंतर व्हिजन महाराष्ट्र २०२९
महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यानंतरच महाराष्ट्रात कोणत्या पक्षाची सत्ता येणार? हे काही दिवसातच स्पष्ट होईल.