Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची एकामागून एक यादी जाहीर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने शनिवारी रात्री उशीरा आपल्या १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. महाविकास आघाडीने काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांना प्रत्येकी ८५- ८५ जागा देण्याचा फॉर्म्युला ठरवून एकूण २५५ जागांसाठी जागावाटप निश्चित केले आहे. उर्वरित २३ जागांचे वाटप प्रत्येक पक्षाच्या उमेदवार याद्यांच्या आधारे ठरविण्यात येणार आहे.
बाबा सिद्दिकी हे वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार होते. याच मतदारसंघातून काँग्रेसने असिफ झकारिया यांना उमेदवारी दिली आहे. सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली. तर, कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांना संधी मिळाली आहे.
१) खामगाव- राणा दिलीपकुमार सानंदा
२) मेळघाट- डॉ. हेमंत नंदा चिमोटे
३) गडचिरोली- मनोहर तुळशीराम पोरेटी
४) दिग्रस - माणिकराव ठाकरे
५) नांदेड दक्षिण- मनोहर अंबाडे
६) देगलूर - निवृत्तीराव कांबळे
७) मुखेड- हनमंतराव पाटील
८) मालेगाव मध्य- एजाज बेग अली बेग
९) चांदवड- शिरीषकुमार कोतवाल
१०) इगतपुरी- लकीभाऊ जाधव
११) भिवंडी पश्चिम- दयानंद चोरगे
१२) अंधेरी पश्चिम- सचिन सावंत
१३) वांद्रे पश्चिम- असिफ झकारिया
भुसावळमधून राजेश तुकाराम, जळगावमधून स्वाती वाकेकर, सावनेरमधून अनुजा सुनील केदार, भंडारामधून पूजा ठक्कर, राळेगावमधून बसंत पुरके, कामठीतून सुरेश भवर, अर्जुनीमधून दिलीप बनसोड, बसईमधून विजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कांदवली पूर्वमधून काळू बधेलिया, आमीमधून जितेंद्र मोघे, जालनामधून कैलास गोरंट्याल, शिरोळमधून गणपतराव पाटील यांनाही पंक्षाने उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. परंतु, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.