Bjp Third Candidate List : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत २५ उमेदवारांनासंधी देण्यात आलीआहे. भाजपने तिसऱ्या यादीसहआतापर्यंत १४६ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तिसऱ्या यादीत विदर्भातील बहुतांश जागांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजपने या यादीत लोकसभेत पराभूत झालेल्या राम सातपुते यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून त्यांना माळशिरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर तिसऱ्या यादीत बोरिवलीच् विद्यमान आमदार सुनिल राणे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी संजय उपाध्याय यांना भाजपाने मैदानात उतरवले आहे. वर्सोव्यातून भारती लव्हेकर यांची उमेदवारी कायम ठेवली असून घाटकोपरमधूनही पराग शाह यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. काटोलमधून इच्छुक असणारे आशिष देशमुख यांना सावनेर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपच्या तिसऱ्या यादीत विदर्भातील बहुतांश जागांचा समावेश आहे. मूर्तिजापूरमधून हरिश पिंपळे, कारंजामधून सई डहाके,तिवसामधून राजेश वानखेडे, मोर्शीमधून उमेश यावलकर, आर्वीमधून सुमित वानखेडे, काटोलमधून चरणसिंग ठाकूर, सावनेरमधून आशिष देशमुख तर नागपूर मध्यमधून शहराचे माजी महापौर प्रवीण दटके यांना पक्षाने संधी दिली आहे.
भाजपने ९९ जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर २२ उमेदवारांची दुसरी यादी आणि सोमवारी २५ जणांची तिसरी यादी भाजपने जाहीर केली असून एकूण १४६ जणांची घोषणा भाजपने आतापर्यंत केली आहे.
संबंधित बातम्या